डोंबिवलीत भंगाराच्या ३०-४० गोडाऊनला भीषण आग, सात तासांनंतर आगीवर नियंत्रण

Dombivli Fire | आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केलं होतं. यामुळे 30 ते 40 गोडाऊन यात जळून खाक झाले आहे. या आगीमुळे परिसरात धुराचे साम्राज्य निर्माण झाल होतं. घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या दहा ते बारा गाड्यांचे आगीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहे.

डोंबिवलीत भंगाराच्या ३०-४० गोडाऊनला भीषण आग, सात तासांनंतर आगीवर नियंत्रण
Follow us
| Updated on: Mar 21, 2024 | 8:17 AM

सुनील जाधव, कल्याण | 21 मार्च 2024 : ठाणे जिल्ह्यात आगीची मोठी घटना घडली आहे. डोंबिवली पूर्वेकडील टाटा पावर गोळवली येथील देशमुख होम्स परिसरात मध्यरात्री दोन ते तीन वाजता भीषण आग लागली. या आगीवर पहाटेपर्यंत नियंत्रण आणता आले नाही. घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या दहा ते बारा गाड्यांचे आगीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. सुदैवाने आगीत कोणतीही जीवन हानी झाली नाही. आगीचे कारणही स्पष्ट झाले नाही. परंतु या आगीमुळे सकाळी परिसरात धुरांचे लोट पसरले होते. अखेर 7 तासांच्या प्रयत्नानंतर डोंबिवली टाटा पावर गोळवली येथील भंगाराच्या गोडवूनची आग नियंत्रणात आली. त्यानंतर आता सध्या कुलिंगचे काम सुरू करण्यात आले.

आगीचे रौद्ररुप, गोडाऊन खाक

टाटा पावर गोळवली भागात पत्रे ठोकून भंगारांचे गोडाऊन उभे करण्यात आले होते. या गोडावूनमध्ये ठाणे जिल्ह्यातील अनेक उपनगरामध्ये भंगार गोळा करणाऱ्या व्यक्तींकडून कापडाचा चिंध्या, प्लास्टिकच्या बॉटल, पिशव्या, लाकडी सामान घेऊन या गोडाऊनमध्ये ठेवले जात होते. त्यानंतर प्लास्टिकपासून विविध प्रॉडक्ट बनवणाऱ्या कंपन्यांना हे प्लास्टिक दिले जात होते.

यासाठी या परिसरात 40 ते 50 गोडाऊन आहेत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक बॉटल आहेत. या ठिकाणीच आग लागली. या आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केलं होतं. यामुळे 30 ते 40 गोडाऊन यात जळून खाक झाले आहे. या आगीमुळे परिसरात धुराचे साम्राज्य निर्माण झाल होतं. कल्याण, भिवंडी, उल्हासनगर , अंबरनाथ परिसरातून सात ते आठ अग्निशमन दलाच्या गाड्या घटना स्थळी दाखल झाल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

अग्नीशमन दलाच्या प्रयत्न सुरुच

आगीच्या दुर्घटनेत सुदैवाने जीवित हानी झाली नाही. आगीची माहिती मिळताच तत्काळ अग्निशमन विभागाच्या 10 ते 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. पाण्याचे टँकर देखील मागवण्यात आले आहे. अग्निशामन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून आगीवर नियंत्रण आणण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू आहे. आगीचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. परंतु शार्टसर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.