फडणवीसांच्या वाढदिवशी उत्सव नको, बॅनर्स, होर्डिंग लावू नका; भाजपकडून आवाहन
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा येत्या 22 जुलै रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने उत्सव करू नका. वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे होर्डिंग, बॅनर्स लावू नका. (Don't Celebrate Devendra Fadnavis Birthday : Bjp)
मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा येत्या 22 जुलै रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने उत्सव करू नका. वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे होर्डिंग, बॅनर्स लावू नका, जाहिरातबाजी करू नका, असं आवाहन भाजपकडून करण्यात आलं आहे. (Don’t Celebrate Devendra Fadnavis Birthday : Bjp)
माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस आहे. यानिमित्ताने पक्षाच्या कोणत्याही नेते/कार्यकर्त्यांनी होर्डिंग, बॅनर लावू नयेत आणि वृत्तपत्रातून/ टीव्ही माध्यमातून जाहिराती प्रसिद्ध करू नयेत, असे आवाहन भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आल्याचे भाजपाचे कार्यालय सचिव मुकुंद कुळकर्णी यांनी कळविले आहे.
सेवाकार्यात योगदान द्या
होर्डिंग, बॅनर, जाहिराती असे कुणी केल्यास त्याची पक्षातर्फे गंभीर दखल घेतली जाईल. त्यामुळे या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. यंदा कोरोनामुळे आपण सारेच अनेक संकटांना तोंड देत आहोत. भाजपातर्फे समाजातील विविध घटकांसाठी राज्यभर मोठ्या प्रमाणात सेवाकार्य केले जाते आहे. त्यामुळे ज्या कुणाला योगदान द्यायचे आहे, त्यांनी सेवाकार्यात योगदान द्यावे, असे आवाहन सुद्धा भाजपकडून करण्यात आले आहे.
देशात कोरोना रुग्णांची संख्या घटली
दरम्यान, देशात गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास 3 हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात 38 हजार 164 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात 499 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. मात्र सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने आणि कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने दिलासा मानला जात आहे. गेल्या 24 तासात भारतात 38 हजार 164 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 499 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 38 हजार 660 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 3 कोटी 11 लाख 44 हजार 229 वर गेला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 3 लाख 8 हजार 456 रुग्ण बरे झाले आहेत. तर 4 लाख 14 हजार 108 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. 4 लाख 21 हजार 665 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 40 कोटी 64 लाख 81 हजार 493 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. (Don’t Celebrate Devendra Fadnavis Birthday : Bjp)
VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 19 July 2021https://t.co/0hgE5ApN0a
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 19, 2021
संबंधित बातम्या:
Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये घट, कोरोनाबळींचा आकडाही 500 च्या खाली
Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये वाढ, कोरोनाबळींमध्ये मात्र घट
संजय राठोड मंत्रिपदासाठी ‘प्रचंड आशावादी’, अजूनही म्हणतात, ‘मंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील!’
(Don’t Celebrate Devendra Fadnavis Birthday : Bjp)