‘माझी छाती अभिमानाने फुलली’, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या पक्षप्रवेशावेळी ठाकरेंचं वक्तव्य

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी चंद्रहार पाटील यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी चंद्रहार पाटील यांनी उद्धव ठाकरे यांचे मनापासून आभार मानले. उद्धव ठाकरे यांनी आपला केलेला सन्मान हा महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलाचा सन्मान आहे, असं मी मानतो, असं चंद्रहार पाटील म्हणाले.

'माझी छाती अभिमानाने फुलली',  डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या पक्षप्रवेशावेळी ठाकरेंचं वक्तव्य
Follow us
| Updated on: Mar 11, 2024 | 5:09 PM

सांगली | 11 मार्च 2024 : महाविकास आघाडीत सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा ही शिवसेना ठाकरे गटासाठी सुटली आहे. या मतदारसंघातून ठाकरे गट डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देणार असल्याची चर्चा होती. अखेर या चर्चांवर आता शिक्कामोर्तब झालंय. कारण चंद्रहार पाटील यांनी आज त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात प्रवेश केला आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी चंद्रहार पाटील यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी चंद्रहार पाटील यांनी उद्धव ठाकरे यांचे मनापासून आभार मानले. उद्धव ठाकरे यांनी आपला केलेला सन्मान हा महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलाचा सन्मान आहे, असं मी मानतो, असं चंद्रहार पाटील म्हणाले. यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली. त्यांनी चंद्रहार पाटील यांचं पक्षात स्वागत केलं. तसेच चंद्रहार पाटील यांच्या पक्षप्रवेशामुले आपली छाती अभिमानाने फुलली असल्याचं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केली.

डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील काय म्हणाले?

“आज मला मनापासून आभार मानायचे आहेत. एका शेतकऱ्याच्या मुलाला आपण सांगली लोकसभेच्या दृष्टीने जो मानसन्मान दिला यातून आपण तमाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मुलाचा मानसन्मान केला. कुस्ती क्षेत्रात काम करत असताना साहेब आम्हाला बोलून दाखवण्यापेक्षा करुन दाखवण्याची सवय आहे. मी जास्त काही बोलणार नाही. पण मला खात्रीने सांगायचे आहे की, येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्याचा निकाल हा पहिला निकाल असेल. मला आपल्या कुटुंबात सहभागी केल्याबद्दल आपले आभार मानतो”, असं चंद्रहार पाटील म्हणाले.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

“मी आपल्या सर्वांचं मातोश्री आणि शिवसेनेत स्वागत करतोय. आज खरंच माझी छाती अभिमानाने फुलून आली आहे. छाती किती इंच झाली ते काही मी सांगू शकत नाही. पण मर्दाची छाती बघितल्यानंतर सांगलीत आपल्याशी लढण्याची कुणाची छाती होणार नाही. संपूर्ण महाराष्ट्रात. पक्षातले पळपुटे पळून जात आहेत, पण मर्द सहभागी होत आहेत. कारण शिवसेना ही नेहमी मर्दांची संघटना आहे. मला मी लहान होतो तेव्हा मारुती माने साहेब होते, ते घरी यायचे, बाळासाहेबांशी बोलायचे, भेटायचे. तीच परंपरा आता कायम आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“चंद्रहार यांचं शिवसेनेत स्वागत करत आहे. तुम्ही काहीतरी संकेत द्या, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. पण जनतेने संकेत दिल्यानंतर आणखी काय संकेत द्यायचे? गदा आणि मशाल हे दोन्ही मर्दाच्या हातात शोभातात. गदा आणि मशाल हातात घेऊन आपल्याला सांगलीतून एक मर्द दिल्लीत पाठवायचा आहे. मला आता जास्त बोलायचं नाही. मी बरेच वर्ष झाले सांगलीत आलो नाही. पण आता येणार. मी पूर्ण महाराष्ट्रात फिरतोय. गद्दारांना आडवं करायचं आहे. या हुकूमशाहीविरोधात लढताना तुमच्यासारखे पैलवान हे शिवसेनेत आले आहेत”, असं ठाकरे म्हणाले.

“भविष्य तुमच्या हातात आहे. कारण संपूर्ण जनता आपल्याकडे आशेने पाहत आहे. आजच्या पक्षप्रवेशानंतर महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वास दृढ झाला असेल की, आपल्यासाठी कुणीतरी लढत आहे. मी प्रचाराला नक्की येईन. पण विजयाच्या सभेला मला बोलवणार आहात ना? विजय मिळवावाच लागेल. मी शुभेच्छा देतो. शेतकऱ्यांच्या अपेक्षांच्या गदाचं वजन खूप मोठं आहेत. ते आपल्याला पेलायचं आहे. ते पेलणं तुमच्या मजबूत खांद्याला शोभण्यासारखं आहे. सांगली जिल्ह्याच्या लोकसभा संघटक पदी चंद्रहार यांची नेमणूक करत आहे”, अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.