‘बेस्ट’ संपामुळे बेहाल मुंबईकरांसाठी एसटीच्या 55 बस रस्त्यावर
मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यावर सुरु असलेली चर्चा निष्फळ ठरल्याने बेस्ट कर्मचाऱ्यांनी संपाचे शस्त्र उगारले आहे. आज दिवसभर मुंबईतील बस डेपोतून एकही बस रस्त्यावर धावली नाही. यामुळे मुंबईकरांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे. सकाळी 7 च्या ड्युटीवर केवळ एक कंडक्टर आणि आठ चालकांनी हजेरी लावली होती. मात्र या संपाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांची गैरसोय टाळण्यासाठी […]
मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यावर सुरु असलेली चर्चा निष्फळ ठरल्याने बेस्ट कर्मचाऱ्यांनी संपाचे शस्त्र उगारले आहे. आज दिवसभर मुंबईतील बस डेपोतून एकही बस रस्त्यावर धावली नाही. यामुळे मुंबईकरांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे. सकाळी 7 च्या ड्युटीवर केवळ एक कंडक्टर आणि आठ चालकांनी हजेरी लावली होती. मात्र या संपाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांची गैरसोय टाळण्यासाठी एसटीने सकाळपासून मुंबईकरांना आधार देत पुढील मार्गावर दिवसभर 55 बसेस सुरू केल्या आहेत.
बेस्टचा संप अजूनही मिटलेला नसून उद्याही मुंबईतील चाकरमन्यांचे हाल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज संपूर्ण मुंबई शहरात बेस्ट संपाचा फटका बसलेला दिसला तर दुसरीकडे खासगी बसेस आणि रिक्षांनी चाकरमन्यांना आधार दिला होता. त्यात एसटीने 55 बस मुंबईकरांसाठी सुरु केल्या आहेत.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुलाबा – 05 बसेस
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मंत्रालय – 05 बसेस
- कुर्ला पश्चिम ते बांद्रा -05 बसेस
- कुर्ला पूर्व ते चेंबूर – 05 बसेस
- दादर ते मंत्रालय – 05 बसेस
- पनवेल ते मंत्रालय – 05 बसेस
- पनवेल ते दादर -10 बसेस
- ठाणे ते मंत्रालय – 15 बसेस
एकूण 55 बसेस दिवसभरात उपरोक्त मार्गावर मुंबईकरांना सेवा देत आहेत .संध्याकाळी 6 वाजेपर्यंत या बसेसद्वारे 123 फेऱ्या करण्यात आल्या.
बेस्ट संपावर तोडगा काढण्यासाठी नुकतेच पालिका आयुक्तांकडे बैठक सुरु आहे. या बैठकीस सभागृह नेत्या विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर आणि शिवसेनेच्या कामगार युनियनकडून सुहास सामंत यांनी बैठकीला उपस्थिती लावली आहे.