मुंबई किती धोकादायक? काही सेकंदात घरासमोर उभी असलेली कार थेट जमिनीत, पहा व्हिडीओ
मुंबईची तुंबई कशी होते हे सांगणारा एक थरारक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. या व्हीडीओमध्ये घरासमोर पार्क करण्यात आलेली एक कार चक्क खड्ड्यात गायब झाली आहे. ही कार अवघ्या काही सेकंदात पाण्यात बुडाली आहे. घाटकोपर परिसरात ही घटना घडली आहे.
मुंबई : मुंबईत सध्या पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी आतापर्यंत झालेल्या पावसामुळे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रस्ते, नाले तुंबल्याचे समोर आले. रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे लोकल सेवासुद्धा विस्कळीत झाली होती. या सर्व कारणांमुळेच मुंबई आर्थिक राजधानी असली तरी राहण्यासाठी खूपच धोकादायक असे शहर आहे, असे अनेकजण म्हणतात. त्याचीच प्रचिती मुंबईकरांना पुन्हा एकदा आली आहे. थोडाजरी पाऊस झाला की मुंबईची तुंबई कशी होते हे सांगणारा एक थरारक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. या व्हीडीओमध्ये घरासमोर पार्क करण्यात आलेली एक कार चक्क खड्ड्यात गायब झाली आहे. ही कार अवघ्या काही सेकंदात पाण्यात बुडाली असून घाटकोपर परिसरातील ही घटना आहे. (due to heavy rain parked car sunk in ditch at Ghatkopar Mumbai)
घरासमोर पार्क केलेली गाडी खड्ड्यात पडली
गेल्या चार दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे. मुंबईत दादर, सायन, माटुंगा, लोअर परेल, मरिन ड्राईव्ह यासारख्या भागात पावसाची रिपरिप सुरु आहे. या पावसामुळे येथील जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले आहे. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा मुंबईच्या घाटकोपर परिसरातील आहे. येथे एका घरासमोर कार पार्क केलेली दिसतेय. मात्र मुसळधार पावसामुळे या भागात बरेच पाणी साचले आहे. पाणी साचल्यामुळे घाटकोपरचा हा भाग भुसभुशीत झाला आहे. कारच्या समोर असलेल्या जमिनीवर खड्डा पडल्यामुळे या खड्ड्यामध्येही चक्क पाणी जमा झाले आहे. याच खड्ड्यात एक कार पडताना व्हिडीओमध्ये दिसत आहे.
काही सेंकदात कार गायब
कारसमोरचा खड्डा हा जास्त खोल नसावा असे आपल्याला प्रथमदर्शनी वाटते. मात्र, कार जशीजशी या खड्ड्यात जाते; तसेतसे हा खड्डा किती धोकादायक आणि खोल असावा हे आपल्याला समजते. कार खड्ड्यामध्ये पडल्यानंतर ती अवघ्या काही सेकंदामध्ये गायब झाली आहे.
पाहा व्हिडीओ :
Scary visuals from Mumbai’s Ghatkoper area where a car drowned in few seconds. pic.twitter.com/BFlqcaKQBo
— Shivangi Thakur (@thakur_shivangi) June 13, 2021
दरम्यान, घरासमोरच्या खड्ड्यामध्ये कार पडून गायब झाल्यामुळे अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. हा व्हिडीओ पाहून मुंबई हे राहण्यासाठी सुरक्षित शहर आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
इतर बातम्या :
Mumbai Rains : पुढील दीड महिना नो टेन्शन! मुंबईतील पाणीसाठ्यात कमालीची वाढ
Rain Live Updates | वाशिम जिल्ह्यातील कामरगाव परिसरात जोरदार पाऊस सुरू
(due to heavy rain parked car sunk in ditch at Ghatkopar Mumbai)