मुंबई : महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना अखेर मुंबई सेशन्स कोर्टाकडून (Mumbai Sessions Court) अंतरिम दिलासा मिळाला आहे. परंतु त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. उच्च न्यायालयात जाण्यासाठी सत्र न्यायालयाने मुश्रीफांना तीन दिवसांचा अंतरिम दिलासा दिला. तसेच न्यायालयाने हसन मुश्रीफ यांच्याविरोधात 14 एप्रिलपर्यंत कारवाई न करण्याचे निर्देश दिले आहेत. अंमलबजावणी संचालयाने (ED) मुश्रीफ यांच्यांवर जे आरोप केले आहेत आणि जे पुरावे न्यायालयात दिले आहेत, ते पाहून न्यायालयाने जामीन नाकारला आहे.
हसन मुश्रीफ यांच्यावर नेमके आरोप काय?
चार आठवड्यांपासून सुनावणी
हसन मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सेशन्स कोर्टाने फेटाळला आहे. मुश्रीफ यांच्या जामीन अर्जावर गेल्या चार आठवड्यांपासून सेशन्स कोर्टात सुनावणी सुरु होती. या प्रकरणी गेल्या दोन आठवड्यांपूर्वी युक्तिवाद पूर्ण झाला होता. कोर्टाने निकाल राखीव ठेवला होता. त्यानंतर कोर्टाने आज हसन मुश्रीफ यांचा जामीन अर्ज नामंजूर केला. मुश्रीफ यांच्यासाठी हा मोठा झटका मानला जातोय. परंतु अटक करण्यास तीन दिवसांची स्थगिती देत मुश्रीफ यांना थोडा दिलासा न्यायालयाने दिला आहे. हसन मुश्रीफ यांना पुढचे दोन आठवडे तरी अटकेपासून संरक्षण मिळावे यासाठी त्यांच्या वतीने वकील प्रशांत पाटील यांनी युक्तिवाद केला होता. तर ईडीचे वकील हितेन वेणूगावकर यांनी मुश्रीफांच्या अर्जाला विरोध केला होता.
हे ही वाचा
TV9 Marathi Exclusive | हसन मुश्रीफ यांच्याविरोधात ईडीला आतापर्यंत काय काय मिळाले पुरावे?