कुंपनाने शेत खाल्ले, पुण्यातील अमर मूलचंदानी यांना माहिती लिक करत होते ED चे दोन कर्मचारी

मुंबईतील अंमलबजावणी संचालनालयात कूंपनच शेत खात असल्याचा प्रकार उघड झाला आहे. मुंबई कार्यालयातील दोन कर्मचारी गोपनीय माहिती व फाईल्स आरोपीला पुरवत होते. हे कर्मचारी पुणे सेवा विकास बँकेचे मूलचंदानी यांना गोपनीय माहिती पुरवत होते.

कुंपनाने शेत खाल्ले, पुण्यातील अमर मूलचंदानी यांना माहिती लिक करत होते ED चे दोन कर्मचारी
ED raidsImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 25, 2023 | 2:05 PM

पुणे : अंमलबजावणी संचालनालयाने (ED) पुणे जिल्ह्यातील सेवा विकास बँकेचे (seva vikas bank) माजी अध्यक्ष अमर मूलचंदानी यांच्याकडे छापेमारी केली होती. या प्रकरणात अमर मूलचंदानी यांच्यासह सहा जणांना अटक करण्यात केली होती. आता या प्रकरणाशी संबंधित नवीन प्रकार समोर आला आहे. कूंपनच शेत खाते असा हा प्रकार आहे. या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या मुंबई कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांचे संबंध उघड झाले आहे. हे कर्मचारी मूलचंदानी यांना गोपनीय माहिती पुरवत होते. तसेच त्यांनी गुप्त फाईल्स लीक केल्याचा त्यांच्यांवर आरोप आहे. या प्रकरणात सेवा विकास सहकारी बँकेचे माजी संचालक अमर मूलचंदानी यांच्या चालकालाही ईडीने अटक केली आहे.

काय झाली होती कारवाई

सेवा विकास बँकेचे माजी चेअरमन अमर मूलचंदानी यांच्याकडे २७ जानेवारी रोजी ईडीने छापेमारी केली होती. त्यांच्या कार्यालय व घरांवर छापे टाकले होते. मूलचंदानी यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे त्यांच्या जवळच्या व्यक्तींना बँकेकडून कर्ज वाटप करुन एकूण 400 कोटींहून अधिकचा घोटाळा केला होता.

हे सुद्धा वाचा

कोणाला झाली अटक

याप्रकरणी मूलचंदानीसह पाच जणांना अटक झाली होती. परंतु अमर मूलचंदानी जामिनावर बाहेर आले होते. त्यानंतर पुन्हा त्याच्यावर ईडीकडून कारवाई झाली. यामुळे त्यांनी ईडीच्या मुंबई कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांना हाताशी धरले.त्या कर्मचाऱ्यांकडून तपासासंबंधीचे अपडेट्स मिळवत होते. ही माहिती ईडीला मिळाली. त्यानंतर ईडीने त्या दोन्ही कर्मचाऱ्यांना अटक केली.

दोन कर्मचारी अमर मूलचंदानीच्या ड्रायव्हरच्या संपर्कात होते, अशी माहिती ईडीला मिळाली होती. त्यानंतर दोघांवर नजर ठेवण्यात आली. या दोघांनी मूलचंदानीला काही कागदपत्रे विकल्याचे ठोस पुरावा ईडीला मिळाला. त्यानंतर दोघांना व मूलचंदानी यांच्या चालकाला अटक करण्यात आली. या तिघांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण

सेवा विकास सहकारी बँकेच्या संचालकांनी कर्जांचे १२४ बनावट प्रस्ताव मंजूर केले होते. या प्रकरणात जवळपास ४३० कोटी रुपये विविध व्यक्ती व संस्थांना नियमबाह्य पद्धतीने वितरित केले. ज्या व्यक्तींची कर्ज मिळण्याची पात्रता नव्हती, त्यांना कर्ज दिले गेले. कर्ज देताना परतफेडीची क्षमता व अन्य निकष तपासले नाही.

यामुळे बँकेचे मोठे नुकसान झाले. सहकार सहआयुक्त राजेश जाधवर यांनी २०२० मध्ये या कर्जांविषयीचे ऑडिट केले होते. त्यानंतर हे घोटाळा उघडकीस आले. या प्रकरणात पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी अमर मूलचंद यांच्यासह पाच जणांना अटक केली होती.

संबंधित बातमीईडीला मिळाले मुलचंदानीच्या घरी घबाड, तीन कोटींचे सोने, हिरे , रोख रक्कम..वाचा सविस्तर

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.