Rana Kapoor | ‘YES बँके’चे माजी सीईओ राणा कपूर यांना 11 मार्चपर्यंत ईडी कोठडी

YES बँकेचे संस्थापक आणि माजी सीईओ राणा कपूर (ED arrests Rana Kapoor) यांना अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.

Rana Kapoor | 'YES बँके'चे माजी सीईओ राणा कपूर यांना 11 मार्चपर्यंत ईडी कोठडी
Follow us
| Updated on: Mar 08, 2020 | 1:18 PM

मुंबई : YES बँकेचे संस्थापक आणि माजी सीईओ राणा कपूर (ED arrests Rana Kapoor) यांना पीएमएलए कोर्टाने 11 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. राणा कपूर यांची सलग 31 तासांच्या चौकशी केल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी आज सकाळी 4 वाजता अटक केली होती. त्यांनंतर ईडी अधिकाऱ्यांनी त्यांना आज दुपारी 12 वाजता पीएमएलए कोर्टात हजर केलं. पीएमएलए कोर्टाने त्यांना 11 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. राणा कपूर यांच्याविरोधात पैशांची अफरातफर अर्थात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

राणा यांनी येस बँकेतून स्वत: च्या मर्जीने जवळच्या लोकांना मोठे कर्ज दिल्याचा आरोप आहे. 2017 मध्ये येस बँकेने 6 हजार 355 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. याबद्दल ईडीकडून चौकशी सुरु होती. अखेर डीएचएफएल आणि यूपी पावर कारपोरेशन कर्ज प्रकरणी त्यांना ईडी अधिकाऱ्यांनी अटक केली. त्यांना आज पीएमएलए कोर्टात हजर केलं गेलं आणि कोर्टाने त्यांना 11 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली.

राणा कपूर यांचे वरळीमध्ये घर आहे. ते वरळीतील समुद्र महल या अलिशान इमारतीत राहतात. ईडीने शुक्रवारी रात्री (6 मार्च) अचानक राणा कपूर यांच्या घरावर धाड टाकली. रात्रभर ईडीने त्यांची चौकशी केली. त्यानंतर ईडी अधिकारी त्यांना चौकशीसाठी काल (7 मार्च) दुपारी 12 वाजता ईडी कार्यालयात घेऊन गेले. तिथे त्यांची कसून चौकशी केली गेली. राणा यांची सलग 31 तास चौकशी चालली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आलं.

राणा यांच्या बिल्डिंगमध्ये नीरव मोदीचा फ्लॅट

वरळीतील समुद्र महल बिल्डिंगमध्ये राणा कपूर यांचे घर आहे. यामध्ये देशातील अनेक दिग्गज उद्योजकांची घरं आहेत. पीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदीचाही येथे फ्लॅट आहे. याशिवाय काही नामांकित कंपन्यांचे गेस्ट हाऊसही या बिल्डिंगमध्ये आहे.

येस बँकेवर निर्बंध

दरम्यान, रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर निर्बंध आणले आहेत. येस बँकेच्या खातेदारांना आता केवळ 50 हजार रुपयेच काढता येणार आहेत. अर्थ मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, 5 मार्चपासून (Yes Bank Withdrawal Limit) 3 एप्रिलपर्यंत हे निर्बंध लावण्यात आले आहेत. शिक्षण, आरोग्य आणि लग्न असेल तरच अधिक रक्कम काढण्याची मुभा आहे. बँकेच्या ढासळलेल्या आर्थिक परिस्थितीला पाहता RBI ने हा निर्णय घेतला आहे. तसेच, SBI चे माजी मुख्य आर्थिक अधिकारी प्रशांत कुमार यांना YES बँकेचे संचालक म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे.

YES बँकेवर कर्जाचा बोजा वाढला

YES बँकेवर कर्जाचा बोजा वाढत चालला आहे. त्यामुळे बँकेची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. भारतीय स्टेट बँक आणि इतर आर्थिक संस्था YES बँकेला या संकटातून बाहेर काढू शकतात, अशी माहिती सूत्रांनी गुरुवारी (5 मार्च) दिली. एसबीआयला यासाठी केंद्राकडून परवानगी देण्यात आल्याचंही सूत्रांनी सांगितलं होतं.

संबंधित बातम्या :

आरबीआयच्या निर्बंधानंतर ‘Yes बँके’बाहेर मध्यरात्री खातेदारांच्या रांगा

YES बँकेवरील निर्बंधाचा फटका, पिंपरी चिंचवड मनपाचे तब्बल 983 कोटी रुपये अडकले

YES बँकेवरील निर्बंधावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणतात…

Rana Kapoor | ‘YES बँके’चे माजी सीईओ राणा कपूर यांच्यावर ईडीची धाड

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.