Pratap Sarnaik property attached: सर्वात मोठी बातमी! प्रताप सरनाईक यांची सव्वा अकरा कोटीची संपत्ती जप्त, शिवसेनेला ईडीचा दुसरा दणका

एनएसीएल घोटाळयाप्रकरणी ईडीने शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची 11 कोटी 36 लाखांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या दोन आठवड्यातील शिवसेनेला हा दुसरा धक्का बसला आहे.

Pratap Sarnaik property attached: सर्वात मोठी बातमी! प्रताप सरनाईक यांची सव्वा अकरा कोटीची संपत्ती जप्त, शिवसेनेला ईडीचा दुसरा दणका
प्रताप सरनाईक यांची सव्वा अकरा कोटीची संपत्ती जप्त, शिवसेनेला ईडीचा दुसरा दणकाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 25, 2022 | 1:13 PM

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( cm uddhav thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (shridhar patankar)यांची संपत्ती जप्त केल्यानंतर ईडीने शिवसेनेला आणखी दुसरा धक्का दिला आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (pratap sarnaik) यांची 11.36 कोटीची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. एनएसीएल घोटाळा प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. यात ठाण्यातील काही जमिनींचा समावेश आहे. सरनाईक आणि शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या दोन आठवड्यात ईडीने केलेली ही दुसरी कारवाई आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे. ईडीने यापूर्वीही एनएसीएल प्रकरणात सरनाईक यांची चौकशी केली होती. मात्र, त्यानंतर कोणत्याच हालचाली झाल्या नव्हत्या. आज अचानक ईडीने सरनाईक यांची संपत्ती जप्त केल्याने या कारवाईने ठाण्यातही खळबळ उडाली आहे.

एनएसीएल घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून प्रताप सरनाईक यांना अनेक समन्स पाठवण्यात आले होते. त्यांच्या मुलाचीही चौकशी करण्याचा ईडीने प्रयत्न केला होता. मात्र, याच प्रकरणात ईडीने मोठी कारवाई केली आहे. त्यांची ठाण्यातील 11 कोटी 36 लाखाची संपत्ती जप्त केली आहे. यात ठाण्यातील दोन जमिनींचा समावेश आहे. या जमिनींची किंमत एवढी असल्याचं सांगितलं जात आहे.

समन्स देऊनही गैरहजर

सरनाईक यांची ईडीने आधी चौकशी केली होती. काही कागदपत्रंही तपासले होते. त्यानंतर त्यांच्याविरोधात मनी लॉन्ड्रिंगची केस नोंदवण्यात आली. त्यानंतर सरनाईक यांना वारंवार समन्स बजावूनही ते चौकशीला हजर राहिले नव्हते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मात्र सरनाईक एकदा चौकशीला सामोरे गेले होते. त्यानंतर आज थेट ईडीने कारवाी केली आहे.

यापूर्वीची कारवाई काय?

यापूर्वीही ईडीने सरनाईक यांच्यावर कारवाई केली होती. प्रताप सरनाईक आणि मोहित अग्रवाल यांनी एनएसईएल घोटाळ्याचे 100 कोटी रुपये विहंग आस्था हौसिंग कंपनीत वळवले होते. त्यातून गुरवली येथे 112 जमिनी विकत घेण्यात आल्या होत्या. त्यातील 78.27 एकर जमिनीचा कालच ईडीने ताबा घेतला आहे. तसेच या जागेवर ईडीने आपले बोर्डही लावले असल्याचं सोमय्या यांनी सांगितलं. घोटाळ्यातील 100 कोटीची रक्कम परत न केल्यास अन्य मालमत्ताही जप्त केली जाईल, असा इशारा ईडीने सरनाईक यांना दिल्याचा दावा सोमय्या यांनी केला होता.

“पीएमएलए कायद्यातर्गत या जमिनींचा कब्जा ईडी, मुंबईने घेतला आहे. Prevention of Money Laundering Act, 2002 च्या अंतर्गत या जमिनींचा ताबा अधिकृतरित्या घेण्यात आला आहे. या जमिनींवर अतिक्रमण ( Trespassing Prohibited) करण्यास बंदी आहे. या जमिनी संबंधी कोणीही कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करण्यात येऊ नये”, असं या बोर्डावर ईडीने लिहिलं असल्याचं सोमय्या यांनी सांगितलं होतं.

संबंधित बातम्या:

मेव्हणा पकडला अन् मुख्यमंत्री बाहेर आले, Nilesh Rane यांची Uddhav Thackeray यांच्यावर खोचक टीका

Uttar Pradesh : योगींच्या शपथविधीला नेते, संत, दिग्गज उद्योगपती लावणार हजेरी, पाहा पाहुण्यांची यादी…

ऑनलाईन गेमसंदर्भातील कायद्यामध्ये बदल करण्यात यावेत; नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांची मागणी

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.