BREAKING : संजय राऊत पुन्हा एकदा अडचणीत, जामीन रद्द होणार?

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढवणारी बातमी समोर आलीय. संजय राऊत यांच्या विरोधात ईडी पुन्हा हायकोर्टात गेलीय.

BREAKING : संजय राऊत पुन्हा एकदा अडचणीत, जामीन रद्द होणार?
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Jan 09, 2023 | 9:15 PM

मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढवणारी बातमी समोर आलीय. संजय राऊत यांच्याविरोधात ईडीकडून तपास सुरुय. विशेष म्हणजे ईडीने संजय राऊत यांचा जामीन रद्द करावा यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केलीय. ईडीकडून गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार या मागणीसाठी याचिका दाखल करण्यात आलीय. पण मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली नाही. त्यामुळे संजय राऊत यांना दिलासा मिळाल्याचं मानलं जात होतं. पण आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संजय राऊत यांचा जामीन रद्द करण्याची मागणी करणाऱ्या ईडीच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे. त्यामुळे तब्बल 100 दिवस जेलमध्ये राहून आलेले संजय राऊत यांच्या कदाचित अडचणी वाढू शकतात, अशी चर्चा सुरु झालीय.

संजय राऊत यांच्या विरोधात ईडी हायकोर्टात गेलीय. संजय राऊत यांचा जामीन रद्द करण्याची मागणी ईडीने केलीय.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई हायकोर्टात 18 जानेवारीला सुनावणी होणार आहे. गोरेगाव पत्राचाळ प्रकरणी ईडी आता हायकोर्टात गेलीय.

हे सुद्धा वाचा

विशेष म्हणजे ईडीने यापूर्वीसुद्धा जामीन रद्द करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. याच आरोपांप्रकरणी ईडीने संजय राऊत यांना अटक केली होती.

याप्रकरणी राऊत तब्बल 100 दिवस जेलमध्ये होते. अखेर 9 नोव्हेंबरला विशेष पीएमएलए कोर्टाने त्यांचा जामीन मान्य केला होता. त्याआधी त्यांचा जामीन अनेकदा रद्द करण्यात आला होता.

संजय राऊत यांच्याविरोधात अजामीनपत्र वॉरंट

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी संजय राऊत यांच्याविषयी आणखी एक बातमी समोर आली होती. संजय राऊत यांच्या विरोधात शिवडी कोर्टाने अजामीनपत्र वॉरंट जारी केलंय.

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा ठोकलेला आहे. शिवडी दंडाधिकाऱ्यांच्या कोर्टासमोर यासंदर्भातला खटला सुरु आहे.

संजय राऊत यांनी ‘सामना’तील अग्रलेखात सोमय्या यांच्याविरोधात शौचालय घोटाळ्याचा आरोप केला होता. 100 कोटींच्या या घोटाळ्याच्या आरोपामुळे आपली बदनामी झाली आहे, असा दावा मेधा सोमय्या यांनी केला होता.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.