निकालाच्या एका दिवसापूर्वी ठाकरे गटाच्या बड्या नेत्याच्या घरी ईडीचे छापे
ed raid on shiv sena mla | शिवसेना गटाचे बडे नेते आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी अमलबजावणी संचालनालयाने छापा टाकला आहे. ईडीचे दहा ते बारा अधिकारी रवींद्र वायकर यांच्या निवासस्थानी आले. त्यांनी कागदपत्रांची तपासणी सुरु केली आहे. जोगेश्वरी भूखंड प्रकरणी चौकशी सुरु आहे.
कृष्णा सोनारवाडकर, मुंबई , दि. 9 जानेवारी 2024 | शिवसेना ठाकरे गटाचे बडे नेते आमदार रवींद्र वायकर यांच्या निवासस्थानी अमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी छापा टाकला आहे. ईडीचे दहा ते बारा अधिकारी रवींद्र वायकर यांच्या निवासस्थानी पोहचले. त्यांनी कागदपत्रांची तपासणी सुरु केली आहे. जोगेश्वरी भूखंड प्रकरणी ही चौकशी सुरु आहे. रवींद्र वायकर हे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackarey) यांच्या जवळचे म्हणून ओळखले जातात. ठाकरे गटाचे बारा आमदार प्रकरणाचा उद्या निकाल आहे. त्यापूर्वी ईडीची छापे सुरु झाले आहे. रवींद्र वायकर यांच्याकडे यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात छापे पडले होते. आता पुन्हा रवींद्र वायकर यांना नोटीस दिली होती. त्यानंतर मंगळवारी सकाळी ८.३० वाजता छापे पडले. मुंबईत आमदार रवींद्र वायकर यांच्यावर सुरु झालेल्या ईडीच्या कारवाईने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. या कारवाईनंतर रवींद्र वायकर यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. ईडीने रवींद्र वायकर यांच्याविरोधात यापूर्वीच गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे रवींद्र वायकर यांच्यावर आरोप
रवींद्र वायकर यांच्या जोगेश्वरी निवासस्थानी ईडीचे पथक मंगळवारी पोहचले आहे. मातोश्री स्पोर्टस ट्रस्टचा आणि सुप्रीमो बँक्वेटच्या नावाने शेकडो कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे. यासंदर्भात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तक्रार केली होती. मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत असलेले क्रीडांगण आणि गार्डनच्या जागेवर बांधकाम केल्याचा आरोपी त्यांच्यावर आहे. जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर व्यारवली गावात जमिनीवर बांधकाम केल्याचा आरोप रवींद्र वायकर यांच्यावर आहे. रवींद्र वायकर यांनी मुंबई मनपाच्या जागेवर बांधलेल्या हॉटेलची किंमत ५०० कोटी असल्याचा दावा भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे.
यापूर्वी झाली होती चौकशी
ईडीने जोगेश्वरी येथील या पंचतारांकित हॉटेलशी संबंधित कागदपत्रांची तपासणी पुन्हा सुरु केली आहे. ईडीकडून यासंदर्भात यापूर्वीही रवींद्र वायकर यांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा चौकशी सुरु केली आहे. या प्रकरणात वायकर यांच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.