Sanjay Raut : आधी संजय राऊत, आता वर्षा राऊतांना ईडीचं समन्स; आजच चौकशी होणार

Sanjay Raut : राऊत यांनी प्रवीण राऊतांकडून आलेल्या पैशातून अलिबागमध्ये जमीन खरेदी केली आहे. त्यांच्या परदेश दौऱ्याचा खर्चही आम्ही तपासत आहोत. आम्ही वर्षा राऊत यांची खाती तपासत आहोत. राऊतांशी संबंधितांना नोटिसा पाठवल्या असून सोमवारपासून त्यांची चौकशी करणार आहोत.

Sanjay Raut : आधी संजय राऊत, आता वर्षा राऊतांना ईडीचं समन्स; आजच चौकशी होणार
आधी संजय राऊत, आता वर्षा राऊतांना ईडीचं समन्स; आजच चौकशी होणारImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 05, 2022 | 7:56 AM

मुंबई: पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) हे ईडीच्या (ED) कोठडीत आहेत. काल त्यांना कोर्टाने पुन्हा 8 ऑगस्टपर्यंतची कोठडी सुनावली आहे. त्यामुळे राऊत यांचा ईडी कोठडीतील मुक्काम वाढला आहे. राऊत आणि त्यांची पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांची तपासणी करायची असून राऊत यांच्याशी संबंधितांची चौकशी करायची असल्याने राऊत यांची कोठडी वाढवून देण्याची मागणी ईडीच्या वकिलाने कोर्टात केली होती. ही मागणी मंजूर करण्यात आली आहे. राऊत यांची ईडी कोठडी वाढलेली असतानाच आता त्यांच्या पत्नी वर्षा राऊत (varsha raut) यांना ईडीने समन्स बजावले आहे. त्यांना आजच चौकशीला हजर राहण्याचे आदेश ईडीने दिले आहेत. त्यामुळे वर्षा राऊत आज ईडीसमोर हजर राहणार असून ईडीच्या चौकशीला सामोरे जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

ईडीने वर्षा राऊत यांना समन्स बजावून आजच चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे वर्षा राऊत आजच ईडीच्या कार्यालयात जाऊन आपला जबाब नोंदवणार असल्याचं सांगितलं जात आहे. प्रवीण राऊत यांनी संजय राऊत आणि वर्षा राऊत यांच्या खात्यात 1 कोटी 6 लाख रुपये टाकले होते. याच पैशातून राऊतांनी अलिबागमध्ये जमीन खरेदी केली होती. त्यामुळे ईडीकडून वर्षा राऊत यांची खाती तपासली जात आहे. तसेच त्यांच्या खात्यात आणखी मोठे व्यवहार झालेत का त्याची पडताळणी केली जात आहे. त्यामुळे वर्षा राऊत यांना चौकशीसाठी बोलवलं आहे. त्यांच्या खात्यात हा पैसा आला कुठून? कशासाठीचे हे पैसे आहेत? त्या मागचा स्त्रोत काय? आदी माहिती ईडी वर्षा राऊत यांच्याकडून घेणार असल्याचं सांगितलं जात आहे.

हे सुद्धा वाचा

वकिलांचे युक्तिवाद

दरम्यान, राऊत यांनी प्रवीण राऊतांकडून आलेल्या पैशातून अलिबागमध्ये जमीन खरेदी केली आहे. त्यांच्या परदेश दौऱ्याचा खर्चही आम्ही तपासत आहोत. आम्ही वर्षा राऊत यांची खाती तपासत आहोत. राऊतांशी संबंधितांना नोटिसा पाठवल्या असून सोमवारपासून त्यांची चौकशी करणार आहोत. त्यामुळे राऊत यांच्या ईडी कोठडीत वाढ करण्याची मागणी ईडीने कोर्टासमोर केली होती. तर राऊत यांच्या वकिलाने हे आरोप फेटाळून लावली होती. हे आरोप नवे नाहीत. राऊतांवर यापूर्वीही असे आरोप झाले आहेत. हा राजकीय षडयंत्राचा भाग आहे. वर्षा राऊत यांच्या व्यवहाराची ईडीला माहिती आहे, असं राऊत यांच्या वकिलाने काल म्हटलं होतं.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.