AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र आल्यानं महाराष्ट्रातील राजकारणावर काय परिणाम होणार? वाचा पाच मुद्द्यांत

अस्मिता वाचवण्यासाठी समविचारी पक्षांनी तसेच व्यक्तींनी एकत्र येण्याची गरज आहे, असे मत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मांडले. भविष्यात संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एक युती म्हणून काम करेल, असे त्यांनी सांगितले.

संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र आल्यानं महाराष्ट्रातील राजकारणावर काय परिणाम होणार? वाचा पाच मुद्द्यांत
पत्रकार परिषदेवेळी सुभाष देसाई, मनोज आखरे आणि उद्धव ठाकरेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 26, 2022 | 2:43 PM

मुंबई : शिवसेना (Shivsena) आणि संभाजी ब्रिगेड या दोन पक्षांनी एकत्र येणार असल्याचे जाहीर केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संभाजी ब्रिगेड यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. यावेळी संभाजी ब्रिगेडचे (Sambhaji Brigade) अध्यक्ष मनोज आखरे, पक्षाचे प्रवक्ते गंगाधर बनबरे तसेच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई उपस्थित होते. केंद्रात भाजपाचे सरकार आहे. तर राज्यातदेखील शिवसेना आमदार फोडून भाजपाने सत्ता हस्तगत केली आहे. यावर यावेळी टीका करण्यात आली. प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व संपुष्टात आणण्याचा भाजपाचा एककलमी कार्यक्रम आहे. त्यामुळे अस्मिता वाचवण्यासाठी समविचारी पक्षांनी तसेच व्यक्तींनी एकत्र येण्याची गरज आहे, असे मत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मांडले. भविष्यात संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एक युती म्हणून काम करेल, असे त्यांनी सांगितले.

पाच मुद्द्यांतून जाणून घेऊ, संभाजी ब्रिगेड-शिवसेना युती आणि परिणाम –

  1. आंदोलनांमुळे चर्चेत – संभाजी ब्रिगेड आपल्या आक्रमक आंदोलनांमुळे चर्चेत असते. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये संभाजी ब्रिगेडचे काम चांगले आहे. निवडणुकीच्या राजकारणात उतरण्याची घोषणा संभाजी ब्रिगेडने केली. त्यानुसार मागील निवडणुकादेखील संभाजी ब्रिगेडने लढविल्या होत्या.
  2. मराठा समाज आकर्षित – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजी ब्रिगेडने इतर मराठा संघटनांसह आंदोलन केले. अजूनही संभाजी ब्रिगेड त्यावर काम करत आहे. अशावेळी मराठा समाजातील मतदारांना आकर्षित करण्यात हे दोन्ही पक्ष यशस्वी होण्याची अधिक शक्यता आहे.
  3. बंडखोरांचा विरोध – राज्यातील राजकारण ढवळून निघाले ते शिवसेनेतील बंडामुळे. शिवसेनेने आता त्यांना गद्दार म्हणत त्यांच्याविरोधात मोहीम उघडली आहे. बंड करणाऱ्यांना सर्वसामान्य साथ देत नाहीत, हा इतिहास वारंवार पटवून दिला जात आहे. अशावेळी संभाजी ब्रिगेडची मदत शिवसेनेला होणार आहे.
  4. भाजपाला शह – केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून भाजपा इतर पक्षांतील अनेकांना आपल्याकडे येण्यास भाग पाडत आहे. शिवसेना पक्षाला फोडून एकाकी पाडण्याचा भाजपाचा प्रयत्न दिसत असताना संभाजी ब्रिगेडशी युती शिवसेनेसाठी फायद्याची ठरणार आहे. आरपीआयचे काही गट शिवसेनेच्या संपर्कात आहेत. त्यामुळे शिवसेना खचली नाही, हा संदेश यानिमित्ताने जाताना दिसून येत आहे.
  5. हे सुद्धा वाचा
  6. लोकशाही वाचवण्यासाठी… – देशात अघोषित हुकूमशाही राज्य सुरू आहे. अशी टीका सातत्याने भाजपावर होत आहे. या वातावरणात लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही शिवसेनेसोबत युती करत असल्याचे संभाजी ब्रिगेडने सांगितले.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'.
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?.
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय.
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल.
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान.
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?.
पहलगामच्या घटनास्थळावर सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांकडून रिक्रिएशन?
पहलगामच्या घटनास्थळावर सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांकडून रिक्रिएशन?.
'वडिलांचा मृतदेह तिथेच ठेऊन मी.. ', हर्षल लेलेने सांगितला थरारक अनुभव
'वडिलांचा मृतदेह तिथेच ठेऊन मी.. ', हर्षल लेलेने सांगितला थरारक अनुभव.
वडिलांची वाढदिवसाच्या एक दिवसाआधी हत्या, चिमुकल्याने सांगितला थरार
वडिलांची वाढदिवसाच्या एक दिवसाआधी हत्या, चिमुकल्याने सांगितला थरार.
हीच ती जागा जिथं पर्यटकांवर गोळ्या, तिथली वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी
हीच ती जागा जिथं पर्यटकांवर गोळ्या, तिथली वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी.