Eid Mehndi Designs : इंटरनेटवरील सर्वोत्कृष्ट मेहंदी डिझाईन्स या ईदला जरूर काढा
Ramadan Eid 2022: 2022 सालच्या ईद उल फितरसाठी बरीच सुंदर मेहंदी डिझाइन्स नेटवर उपलब्ध आहेत. यापैकी कोणतीही डिझाईन या उत्सवासाठी निवडू शकता. या मेहंदी डिझाईन्स खूप वैविध्यपूर्ण आहेत.
मुंबई : देशभरात ईदची धूम सुरु आहे. आज ईदचा चंद्र दिसल्यानंतर ईद उल फित्र (Eid Al-Fitr)चा सण सुरू झाला. ईद उल फित्रला छोटी ईद असेही म्हणतात. या प्रसंगी शेवया, फिरणी आणि खीर यांसारखे स्वादिष्ट पदार्थही घरी तयार केले जातात म्हणून याला मिठी ईद म्हणून ओळखले जाते. या दिवशी मुलांना त्यांच्या वडीलधाऱ्यांकडून ईदी (पैसे किंवा भेटवस्तू) दिली जातात. यामुळे त्यांच्यासाठी ईद उल फित्र अधिक खास बनते. हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी अनेक मुली आणि स्त्रिया त्यांच्या हातावर आणि पायावर सुंदर मेहंदी (Mehandi) काढतात. दोन वर्षे कोरोनामुळे सण-उत्सव साजरे करण्यास बंदी होती. त्यामुळे यंदा कोणताही लॉकडाऊन, निर्बंध नसल्याने मुस्लिम बांधवांमध्ये ईदचा उत्साह अधिक आहे. (Eid-al-Fitr 2022 Best mehndi designs for Ramadan Festival on the internet)
वैविध्यपूर्ण मेहंदी डिझाईन्स नेटवर उपलब्ध
सण कुठलाही असो. महिला वर्गाची मात्र नटण्या-सजण्यासाठी भारी लगबग सुरु असते. महिलांच्या श्रृंगारातील महत्वपूर्ण भाग म्हणजे मेहंदी. मेहंदी काढण्यासाठी महिला वर्गाला व्कचितच निमित्ताची आवश्यकता भासत असेल. 2022 सालच्या ईद उल फितरसाठी बरीच सुंदर मेहंदी डिझाइन्स नेटवर उपलब्ध आहेत. यापैकी कोणतीही डिझाईन या उत्सवासाठी निवडू शकता. या मेहंदी डिझाईन्स खूप वैविध्यपूर्ण आहेत. तुम्ही एकतर क्लासिक डिझाइन्स निवडू शकता ज्यामध्ये संपूर्ण तळहात झाकलेला असतो किंवा तुम्ही लोकप्रिय अरबी डिझाइन निवडू शकता, जे बहुतेक तळहाताच्या मागील बाजूस काढलेले असतात.
तुम्ही मिनिमलिस्टिक मेहंदी डिझाइन देखील वापरून पाहू शकता जे आजकाल महिलांमध्ये खूप लोकप्रिय आहे. किंवा एखादे डिझाईन निवडणे तुमच्यासाठी थोडे कठीण किंवा गोंधळात टाकणारे असेल, तर तुम्ही नेहमी लोकांना आवडणाऱ्या फुलांच्या मेहंदीचे नमुने निवडू शकता.
तुम्हाला नवीन गोष्टींचा प्रयोग करायचा असेल तर या वर्षी काही नवीन किंवा मूळ डिझाइन्स पहा. खालील मेहंदी डिझाईन्स पहा जे तुम्हाला या वर्षीच्या ईद उल फित्र सेलिब्रेशनसाठी डिझाइन निवडण्यास प्रेरित करतील. (Eid-al-Fitr 2022 Best mehndi designs for Ramadan Festival on the internet)