‘मोदींना औरंगजेबाची उपमा देणं हा देशद्रोह’, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

"हे फोटोग्राफर, त्यांना शेपटी असलेल्या प्राण्यांचे फोटो काढायला आवडत होते. त्यातून त्यांना शेपटीवर जास्त प्रेम झालंय. वेळप्रसंगी शेपूट घालणारे, दिल्लीचं लोटांगण घालणारे, नोटीस आली की घाम फुटणारे, वेळेला शेपूट घालणारे कोण आहेत? मुख्यमंत्रीपदासाठी कुणी शेपूट घातली?", अशा खोचक शब्दांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर निशाणा साधला.

'मोदींना औरंगजेबाची उपमा देणं हा देशद्रोह', एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Follow us
| Updated on: Mar 21, 2024 | 6:31 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी काय-काय कामं करायची, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आवाहन केलं. या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी बैठकीत नेमकी काय-काय चर्चा झाली, या विषयी थोडक्यात माहिती दिली. तसेच त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची औरंगजेबाशी तुलना केली होती. याच टीकेवरुन एकनाथ शिंदे यांनी राऊतांवर निशाणा साधला.

“लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून 45 पेक्षा जास्तीच्या जागा महायुतीच्या आल्या पाहिजेत यासाठी प्रत्येक मतदारसंघात शिवसैनिक, पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना अतिशय सक्षमपणे काम केलं पाहिजे. याबाबत आढावा बैठक, मतदारसंघाच्या समस्या सोडवल्या पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा निवडून यायला पाहिजे यासाठी काम करण्याचं आवाहन करण्यात आलं. या बैठकीसाठी प्रत्येक मतदारसंघातील पदाधिकारी, आमदार, खासदार, जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख यांच्यासोबत चर्चा झाली”, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

‘मोदींना औरंगजेबाची उपमा देणं हा देशद्रोह’, शिंदेंचं वक्तव्य

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशाला नवी आयाम दिला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं राम मंदिर बांधण्याचं आणि काश्मीरचं कलम 370 हटवण्याचं स्वप्न होतं. ते स्वप्न मोदींनी पूर्ण केलं. अशा आदरणीय पंतप्रधानांना औरंगजेब म्हणणं हा देशाचा अपमान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना औरंगजेबाची उपमा देणं हा देशद्रोह आहे. खऱ्या अर्थाने यांची निंदा करावी तेवढी थोडी आहे. कारण औरंगजेब वृत्ती त्यांनी दाखवली. कारण आपल्याला माहिती आहे औरंगजेबाने आपल्या भावाला, वडिलांनाही सोडलं नाही. नातेवाईकांनाही सोडलं नाही. तीच औरंगजेबी वृत्ती ज्यांनी दाखवली ते महाराष्ट्राला माहिती आहे. म्हणून त्यांच्याकडून दुसरं काय अपेक्षित करणार?”, असा खोचक सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

‘मोदींचा अपमानाचा सूड जनता…’

“त्यांना महाराष्ट्राची जनता मतपेटीच्याद्वारे उत्तर देईल. मोदींचा अपमानाचा सूड मतपेटीतून महाराष्ट्राची जनता घेईल. देशाचे कणखर आणि धाडसी गृहमंत्री अमित शाह यांनी मोदींच्या मार्गदर्शनाखाली कलम 370 हटवलं. जे एक स्वप्न होतं, स्वप्नवत वाटत होतं ते त्यांनी करुन दाखवलं. यातून त्यांनी देशभक्तीचा परिचय दिला. त्यांना शेपूट घालणं म्हणणं ही मर्दूमकी नाही. त्याचा निषेध केला पाहिजे”, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी मांडली.

‘मुख्यमंत्रीपदासाठी कुणी शेपूट घातली?’

“हे फोटोग्राफर, त्यांना शेपटी असलेल्या प्राण्यांचे फोटो काढायला आवडत होते. त्यातून त्यांना शेपटीवर जास्त प्रेम झालंय. वेळप्रसंगी शेपूट घालणारे, दिल्लीचं लोटांगण घालणारे, नोटीस आली की घाम फुटणारे, वेळेला शेपूट घालणारे कोण आहेत? मुख्यमंत्रीपदासाठी कुणी शेपूट घातली?”, अशा खोचक शब्दांत एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. याकूब मेमनचं कबर सजवणं हे कोणतं देशप्रेम आहे? असा सवालही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला. तसेच उद्धव ठाकरेंनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना शिवतीर्थावर आणलं, अशी टीका एकनाथ शिंदेंनी केली.

वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.