शपथविधी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा, कार्यक्रमाच्या निमंत्रणावरुन महाराष्ट्रात चर्चांना उधाण, एकनाथ शिंदे जाणार की नाहीत?

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधित 156 जागांवर विजय मिळाल्यानंतर आता तिथे सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आलाय.

शपथविधी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा, कार्यक्रमाच्या निमंत्रणावरुन महाराष्ट्रात चर्चांना उधाण, एकनाथ शिंदे जाणार की नाहीत?
Follow us
| Updated on: Dec 12, 2022 | 11:03 PM

गिरीश गायकवाड, मुंबई : गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधित 156 जागांवर विजय मिळाल्यानंतर आता तिथे सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आलाय. भाजपला गुजरातमध्ये विधानसभेच्या 182 पैकी 156 जागांवर यश मिळाल्याने भाजपचा ऐतिहासिक विजय झालाय. त्यामुळे तिथे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याच नेतृत्वात पुन्हा नवं सरकार स्थापन होणार असल्याचं स्पष्ट आहे. विशेष म्हणजे नव्या सरकारचा शपथविधी सोहळा 12 डिसेंबरला सोमवारी आयोजित करण्यात आलाय. या कार्यक्रमाचं अधिकृत निमंत्रण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळालं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुजरातच्या नव्या सरकारच्या शपथविधीच्या कार्यक्रमाला जाण्याची शक्यता आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे हे भूपेंद्र पटेल यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. NDAचा मित्रपक्ष म्हणून बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या नात्याने त्यांना भुपेंद्र पटेल यांच्या शपथविधीसाठी निमंत्रण देण्यात आलंय.

एकनाथ शिंदे यांना शपथविधीचं निमंत्रण आल्यानंतर महाराष्ट्रात सर्वसामान्यांमध्ये विविध चर्चांना उधाण आलंय. महाराष्ट्रात चार महिन्यांपूर्वी सत्तांतर झालं. सत्तांतरापूर्वी महाराष्ट्रात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं सरकार होतं. राज्यात आज महाविकास आघाडीचं सरकार असतं तर आज कदाचित गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमाचं निमंत्रण शिंदे यांच्या ऐवजी ‘मातोश्री’ निवासित उद्धव ठाकरे यांना देण्यात आलं असतं, अशी चर्चा सुरुय.

हे सुद्धा वाचा

दरम्यान, भूपेंद्र पटेल यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.