तब्बल 318 प्रश्न, सुनील प्रभू यांची ‘उलट’ साक्ष, प्रभू यांच्या अखेरच्या सुनावणीच्या दिवशी जोरदार खडाजंगी

शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणी आज महत्त्वाची सुनावणी पार पडली. विशेष म्हणजे गेल्या दोन आठवड्यांपासून ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची उलट साक्ष नोंदवण्याचं काम सुरु होतं. अखेर सुनील प्रभू यांची उलट साक्ष नोंदवण्याची प्रक्रिया आज संपली. शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी सुनील प्रभू यांना तब्बल 318 प्रश्न विचारले.

तब्बल 318 प्रश्न, सुनील प्रभू यांची 'उलट' साक्ष, प्रभू यांच्या अखेरच्या सुनावणीच्या दिवशी जोरदार खडाजंगी
Follow us
| Updated on: Dec 02, 2023 | 6:38 PM

विनायक डावरुंग, Tv9 मराठी, मुंबई | 2 डिसेंबर 2023 : शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणी आज नियमित सुनावणी पार पडली. गेल्या दोन आठवड्यांपासून ही सुनावणी नियमितपणे सुरु आहे. या दोनही आठवड्यांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची फेरसाक्ष नोंदवली. सुनील प्रभू यांची दररोज पाच ते सहा तास सलग फेरसाक्ष नोंदवली जात होती. या दरम्यान सुनील प्रभू यांना घेरण्यासाठी महेश जेठमलानी यांनी वेगवेगळे प्रश्न विचारले. सुनील प्रभू यांना काही प्रश्नांची उत्तरे देताना अडचणीदेखील आल्या. पण अखेर सुनील प्रभू यांची फेरसाक्ष आज संपली. सुनील प्रभू यांची तब्बल 318 प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर उलटसाक्ष संपली. विशेष म्हणजे आजच्या सुनावणीतही शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी आणि ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत आमनेसामने आले.

या प्रकरणी काल झालेल्या सुनावणीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या ईमेल आयडीवरुन सवाल-जवाब आणि युक्तिवाद झाला. ठाकरे गटाकडून पाठवण्यात आलेला ईमेल आयडी हा बनावट होता, असा युक्तिवाद महेश जेठमलानी यांनी केला. त्याला देवदत्त कामत यांनी विरोध केला. विशेष म्हणजे महेश जेठमलानी यांनी पुरावा म्हणून विधानसभेची नोंदवही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सादर केली. त्यावर देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ईमेल आयडीवर सुनावणीत आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ईमेल आयडी खरा असून त्यावरच पत्र पाठवण्यात आलं, असा युक्तिवाद ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी केला. ठाकरे गटाच्या वकिलांकडून विधिमंडळाची नोंदवही सादर करण्यात आली. त्यात एकनाथ शिंदे यांचा जो ईमेल आयडी आहे त्यावरच पत्र व्यवहार करण्यात आला आहे. मग हा मेल आयडी खोटा आहे हे तुम्ही कस म्हणून शकता? असा सवाल वकील देवदत्त कामत यांनी केलाय. “आम्ही ठाम आहेत. हा ईमेल आयडी बनावट आहे. माझ्या मुद्द्यावर अध्यक्ष निर्णय घेतील”, असं प्रत्युत्तर शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी दिलं.

नेमका सवाल-जवाब काय?

देवदत्त कामत – शिंदे गटाकडून जानेवारी महिन्यातील नोंदवही दाखवण्यात येत आहे. त्यांच्याकडून मे महिन्यात प्रकाशित झालेली नोंदवही दाखवण्यात आली नाही. मे महिन्यात पहिल्याच पानावर एकनाथ शिंदे यांचा तोच ईमेल आयडी दिला आहे, जो आम्ही सादर केला आहे. ही कुठली बनवाबनवी आहे. हे सरळ सरळ दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे

जेठमलानी – आम्ही ठाम आहोत. हा मेल आयडी बनावट आहे. माझ्या मुद्द्यावर अध्यक्ष निर्णय घेतील

जेठमलानी – मी सांगू इच्छितो की आपल्या प्रतिज्ञापत्रानुसार २५ जून २०२२ रोजी कुठलीही राष्ट्रीय कार्यकारीणी किंवा प्रतिनिधी सभा झाली नाही. तसेच कुठलाही ठराव त्यात संमत झाला नाही.

प्रभू – हे खोटे आहे.

जेठमलानी – या बैठकीची कुठलीही नोटीस प्रतिवादी आमदारांना देण्यात आली नव्हती?

प्रभू – मला आठवत नाही.

जेठमलानी – या बैठकीचा कुठलाही अजेंडा बैठकीपूर्वी प्रसारित करण्यात आला नव्हता?

प्रभू – मला नाही आठवत

जेठमलानी – शिवसेनेत पक्ष प्रमुख असे कुठलेही पद अस्तित्वात नाही.

प्रभू – ऑन रेकॉर्ड आहे

जेठमलानी – एक्झिबिट पी १२ए मधील आर्टिकल १४ नुसार शिवसेना पक्ष प्रमुख हे पद नाही. किंवा या पदावरील व्यक्तीचे निर्णय बंधनकारक नाहीत.

प्रभू -ऑन रेकॉर्ड आहे

जेठमलानी – शिवसेना राजकीय पक्षात राष्ट्रीय कार्यकारीणी ही निर्णय घेणारी मुख्य संस्था आहे. आपण म्हटल्याप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख हे पद नव्हे.

प्रभू – हे खोटे आहे.

जेठमलानी – आपण संघटनात्मक केलेले बदल हे तरतुदींविरोधात आहेत. तसेच पक्षाच्या लोकशाही तत्वांविरोधात आहेत. निवडणूक आयोगाने पक्षांतर्गत निवडणुकांसदर्भात केलेले बदल हे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी अंगीकारले होते.

प्रभू – हे खरे नाही.

जेठमलानी – प्रभू तुम्ही २४ जून २०२२ रोजी एकनाथ शिंदे आणि १५ आमदार यांच्या विरोधाच अपात्रता याचिका दाखल केलेली आहे. मग उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना ३० जूनपर्यंत पदावरून हटवण्यासाठी वाट का पाहिली?

प्रभू – ऑन रेकॉर्ड आहे

अध्यक्ष – आपल्याला प्रश्न समजला ना? आपण अपात्रता याचिका २४ जूनला दाखल केली. मग उद्धव ठाकरे यांनी ३० जूनपर्यंत शिंदे यांना पदावरून हटवण्यासाठी वाट का पाहिली?

प्रभू – मला आता आठवत नाही.

(अध्यक्षांकडुन नोंद घेतली जात आहे. साक्षीदाराने वकिलांना प्रश्नाचे उत्तर दिले नाही. उत्तर आठवत नाही, असे साक्षीदाराकडून सांगण्यात आले.)

जेठमलानी – आपल्या एकत्रित याचिका आणि संजय राऊत यांनी ज्या हिंसाचाराच्या धमक्या दिल्या होत्या, त्यामुळे शिंदे आणि इतर आमदार हे परतील असे त्यांना वाटले होते.

प्रभू – हे खोटे आहे

जेठमलानी – उद्धव ठाकरे यांना समजले की धाट धकटशाह करून मुख्यमंत्री पदावर आपण राहू शकत नाही, तेव्हा त्यांच्याकडून शिंदे यांना काढण्याचा प्रयत्न करण्यात आला.

प्रभू – हे खोटे आहे

जेठमलानी -पूर्वीच्या घटनेनधील तरतुदीनुसार उद्धव ठाकरे यांना मनमानी आणि घटनाविरोधी तरतुदी करत्या आल्या नसत्या.

प्रभू – हे खोटे आहे

जेठमलानी – २०१८ हे पहिल्यांदा तेव्हा प्रकाशात आले, जेव्हा २०२२ मध्ये अपात्रता कार्यवाही सुरु झाली. तसेच निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डवर हे बदल नाहीत.

प्रभू – हे खोटे आहे

जेठमलानी – २०२२मधील जे बनावट कागदपत्रे आहेत, ती निवडणूक आयोगाने जी पक्षांतर्गत लोकशाही स्विकारण्यास भाग पाडले होते, त्याऐवजी उद्धव ठाकरे यांचा एकाधिकारशाही प्रस्तावित करणे होते

प्रभू – हे खरे नाही

जेठमलानी – २०१८ सालच्या कथित घटना दुरुस्ती मागील मुख्य सुत्रधार हे उद्धव ठाकरे आणि अनिल देसाई हे होते?

प्रभू – हे खरे नाही

जेठमलानी – अनिल देसाई हे ३० जून २०२२ रोजी उद्धव ठाकरे यांच्या तर्फे एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांना पदावरून हटवण्यात येत आहे, हे १ जुलै २०२२निवडणूक आयोगाला कळवले.

प्रभु – हे खोटे आहे

जेठमलानी – उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांना पक्षातील पदावरून पक्षाविरुद्ध कारवाई करत असल्याने काढत असल्याचे निवडणूक आयोगाला कळवले, हे आपण जो पक्षादेश काढला आहे त्यानुसार शक्य नाही.

प्रभू – हे खरे नाही

जेठमलानी – आपण शिवसेना आमदारांना ४ जुलै २०२२ रोजी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली चाललेल्या सरकार विरोधात मतदान करण्याचा व्हीप का काढला?

प्रभू – ज्या आमदारांना व्हीप बजावला होता, त्यांनी पक्ष विरोधी कृत्य केले होते. महाविकास आघाडी सरकार विरोधात भूमिका घेतली होती, त्यामुळे तो विश्वास दर्शक ठराव होता. महाविकास आघाडीला विश्वास दर्शक ठरावाच्या बाजूने मतदान करावे ही भूमिका होती. म्हणून पूर्ण वेळ उपस्थित राहून भाजपने जो विश्वास दर्शक ठराव मांडला होता, त्याविरुद्ध महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देण्यासाठी मी व्हीप काढला होता.

(सुनील प्रभू यांकडून उत्तरात पुन्हा बदल करण्याची विनंती. अध्यक्षांकडून उत्तरात बदल करण्यास परवानगी देण्यात आली.)

प्रभूंच सुधारित उत्तर – सर्वच आमदारांना व्हीप बजावला होता. काही आमदार पक्षविरोधी मतदान करणार होते, असे समजले. विश्वासदर्शक ठराव भारतीय जनता पक्षाने मांडला होता. या ठरावाला महाविकास आघाडीने विरोध दर्शवला होता. शिवसेना महाविकास आघाडीसोबत होती. म्हणून विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात मतदान करावे, महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान करावे म्हणून हा व्हीप काढण्यात आला

जेठमलानी – २०१९ मध्ये विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत नाना पटोले अध्यक्षपदी उभे असताना आपण व्हिप काढला होतात का ?

प्रभू – प्रत्येक निवडणुकीत पक्षादेश काढला जातो. आता मला आठवत नाही

जेठमलानी – प्रत्येक अध्यक्ष पदाच्या निवडणुकीला शिवसेनेने व्हिप काढला नव्हता?

प्रभू – काही वेळा बिनविरोध झाली असेल म्हणून नसेल काढला

जेठमलानी – ज्या प्रकरणात अध्यक्ष पदाच्या निवडणूक झाल्या, बिनविरोध निवडणूक झाल्या नाहीत, अशावेळी ही शिवसेनेने व्हीप काढला नाही.

प्रभु – हे खोटे आहे

जेठमलानी – ३ जुलै २०२२ रोजीच्या अधिवेशनात आपण उपस्थित होतात का?

प्रभु – आता मला नेमके आठवत नाही. ३ जुलैचे. मला बघावे लागेल.

जेठमलानी – अधिवेशनात एकनाथ शिंदे यांनी विश्वास दर्शक ठराव मांडला. त्यावेळी आपण हजर होतात का ?

प्रभू – मी हजर होतो ऑन रेकॉर्ड होतो

जेठमलानी – मग तुम्ही विश्वासदर्श ठरावाच्या विरोधात मतदान केले का ?

प्रभू – हो, मी त्या विश्वास दर्शक ठरावाच्या विरोधात मतदान केलं

जेठमलानी – एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या विश्वास दर्शक प्रस्तावावेळी ४ जुलै २०२२ रोजी आपण उपस्थित होता का?

प्रभू – ऑन रेकॉर्ड आहे.

जेठमलानी – अध्यक्ष महोदय, प्रत्येक प्रश्नावेळी फक्त ऑन रेकॉर्ड आहे हे योग्य नाही. त्यांनी हो किंवा नाही किमान एवढे तरी उत्तर द्यावे.

प्रभू – ऑन रेकॉर्ड आहे, मी हजर होतो.

जेठमलानी – आपण त्या दिवशी विश्वास दर्शक ठरावाविरोधात मतदान केले, हे खरं आहे का?

प्रभू – हो केलं.

जेठमलानी – मतदारांना सादर करण्यात आलेल्या निवडणूक पूर्व युतीच्या विरोधात आपण मतदान करून शिवसेनेचे सदस्यत्व सोडले आहे का?

प्रभू – हे खोटे आहे साहेब.

जेठमलानी – २०२२ रोजी अपात्रता याचिकेतील ठरावाची प्रत आपल्याला कशी आणि केव्हा मिळाली?

प्रभू – आता आठवत नाही अध्यक्ष महाराज

२१ जून २०२२ रोजी आपण उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची भेट घेतली होती का ?

जेठमलानी – आता आठवत नाही

जेठमलानी – शिवसेना पक्षाच्या विचारधारेत हिंदुत्वाचा समावेश होता का?

प्रभू – हो नक्की आहे.

जेठमलानी – बाळासाहेब ठाकरे यांना हिंदूहृदय सम्राट नावाने ओळखले जाते, हे तुम्हाला माहिती आहे का?

प्रभू – हे सर्व जगाला माहिती आहे.

(प्रश्न भाषांतर करण्याआधीच प्रभू यांचे जोरात उत्तर)

जेठमलानी – तुमच्या माहितीनुसार, शिवसेना राजकीय पक्ष किंवा शिवसेना पक्षप्रमुख यांनी हिंदुत्वाची भूमिका मवाळ घेण्याचा निर्णय घेतला होता का?

प्रभू -हे धादांत खोटे आहे.

प्रभू – शिवसेना कधीही हिंदुत्वाच्या विचारांपासून लांब जाऊ शकत नाही (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

जेठमलानी – मी पूर्ण सहमत आहे

जेठमलानी – उद्धव बाळासाहेब ठाकरे हा राजकीय पक्ष नसून राजकिय नेत्यांचा समूह आहे

प्रभू – हे खरं नाही

जेठमलानी – हा पक्ष कधी स्थापन केला?

सुनील प्रभू – मला आठवतं नाही, मला माहीत नाही

जेठमलानी – हा पक्ष कधी स्थापन केला

सुनील प्रभू – मला माहीत नाही, म्हणजे मला आठवत नाही.

जेठमलानी यांनी यावेळी एनसीपी शरद पवार असा उल्लेख केला. त्यावर ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी आक्षेप घेतला. निवडणूक आयोगात अद्याप हा निर्णय झालेला नाही. त्यामुळे फक्त एनसीपी असा उल्लेख करण्याची मागणी केली. त्यावर जेठमलानी यांनी प्रश्नात बदल केला

जेठमलांनी – मी आपल्याला पुढे असे सांगू इच्छितो की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी, हिंदुत्वाची विचारधारा सोडून राष्ट्रवादीशी आणि काँग्रेसशी हाथ मिळवनी केली आहे का?

सुनील प्रभू – हे खोटे आहे

जेठमलानी – आपण पूर्वी दिलेल्या उत्तरात काय खोटे आहे? १) उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली? २) काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी हिंदुत्ववादी विचारसरणीवर टीका केली नाही? ३) हे दोन्ही

प्रभू – प्रश्न खूप कठीण आहे, मला उत्तर देता येणार नाही.

जेठमलानी – मी शेवटचा प्रश्न हा शब्द वगळतो. या तीनपैकी कुठली गोष्ट सत्य आहे? १) उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली? २) काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी हिंदुत्ववादी विचारसरणीचा विरोध केला आणि निषेध केला? ३) हे दोन्ही असत्य आहे?

प्रभू – उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी सोबत हातमिळवणी नाही तर युती केली, हे सत्य आहे.

प्रभू – मग असत्य काय आहे?

प्रभू – मला आठवत नाही.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.