‘अजित पवार यांची राष्ट्रवादीत घुसमट, आमच्यासोबत आले तर…’, शिंदे गटाकडून खुली ऑफर, आता पुढे काय?

शिंदे गटातील एका मंत्र्याने थेट अजित पवार यांना आपल्या पक्षात येण्याची खुली ऑफर दिलीय. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय.

'अजित पवार यांची राष्ट्रवादीत घुसमट, आमच्यासोबत आले तर...', शिंदे गटाकडून खुली ऑफर, आता पुढे काय?
Follow us
| Updated on: Dec 25, 2022 | 5:37 PM

गुरुप्रसाद दळवी, सिंधुदुर्ग : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार नुकतंच पत्रकारांवर भडकले होते. कारण पत्रकारांनी त्यांना शरद पवार यांच्याविषयी एक प्रश्न विचारला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विधानसभेत निलंबित करण्यात आल्यानंतर अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेवर शरद पवार नाराज असल्याच्या चर्चा होत्या. या चर्चांबाबत अजित पवारांना प्रश्न विचारला असता ते पत्रकारांवर भडकले. ‘मी दुधखुळा नाही. विरोधी पक्षनेत्याचं काम काय असतं ते मला कळतं’, असं अजित पवार म्हणाले होते. दुसरीकडे अजित पवार यांच्यावर महाविकास आघाडीतीलही आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. अशा परिस्थितीत शिंदे गटातील एका मंत्र्याने थेट अजित पवार यांना आपल्या पक्षात येण्याची खुली ऑफर दिलीय. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय.

महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही घडू शकतं. मग ते अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2019 ची पहाटेची शपथविधी असूद्या किंवा शिंदेंनी शिवसेना फोडत भाजपसोबत मिळवलेलं सरकार असूद्या. राजकारणात काहीही घडू शकतं. पण राज्यात सध्या हिवाळी अधिवेशनात सुरु असलेल्या घडामोडींवरुन शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी थेट अजित पवार यांना आपल्या पक्षात येण्याची ऑफर दिलीय.

हे सुद्धा वाचा

“अजित पवार आमच्यासोबत आले तर आनंदच होईल. राष्ट्रवादीत अजित पवार यांची घुसमट होतेय हे सर्वांना माहिती आहे. उमदा नेते आमच्यासोबत आले आनंदच होईल”, असं दीपक केसरकर म्हणाले आहेत.

“राजकारणात एकमेकांची मैत्री असते. एकमेकांप्रती आदर असतो. अजित दादा यांच्याबद्दल आम्हाला सगळ्यांना आदर आहे. अजित दादा आपल्या सगळ्यांसोबत आले तर आनंदच होईल. राष्ट्रवादीत त्यांची जी घुसमट होतेय ती सगळ्यांनी बघितलीय. त्यामुळे त्यांच्यासारखा उमदा नेते आमच्यासोबत आले तर आनंदच आहे”, अशी भूमिका दीपक केसरकर यांनी मांडलीय.

दीपक केसरकर यांनी अजित पवारांना दिलेली ऑफर ही खरंच ऑफर आहे की, त्यांना दिलेला मिश्किल टोला आहे याबाबत ज्याने त्याने ठरवावं. पण ही ऑफर खरी असेल आणि शिंदे गटाकडून अजित पवारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करण्यात आला तर आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी वेगळ्या घडामोडी घडू शकतात.

अर्थात या सगळ्या जर-तरच्या गोष्टी आहेत. कागदावर आणि अधिकृतपणे जे स्पष्ट होतं तेच खरं मानलं जातं. त्यामुळे अजित पवार आणि शिंदे गटाची जवळीक वाढते का? ते आगामी काळात स्पष्ट होईलच.

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....