मोठी बातमी! ‘काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल…’, शिंदे गटातील सर्व आमदार-मंत्र्यांचा गुवाहाटी दौऱ्याचा मुहूर्त ठरला

सूत्रांकडून मिळालेल्या नव्या माहितीनुसार, शिंदे गटाचा पुन्हा गुवाहाटी जाण्याचा मुहूर्त ठरला आहे. शिंदे गटाचे सर्व मंत्री आणि आमदार याच महिन्यात गुवाहाटीला जाणार आहेत.

मोठी बातमी! 'काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल...', शिंदे गटातील सर्व आमदार-मंत्र्यांचा गुवाहाटी दौऱ्याचा मुहूर्त ठरला
Follow us
| Updated on: Nov 21, 2022 | 5:53 PM

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी बातमी समोर आलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सर्व 50 आमदारांसह पुन्हा गुवाहाटीला जाणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून वारंवार समोर येत होत्या. शिंदे गटाच्या मंत्र्यांना अनेकदा पत्रकारांनी कॅमेऱ्यासमोर आणि कॅमेऱ्याच्या पाठीमागे गुवाहाटीच्या नव्या दौऱ्याबद्दल विचारणा केली होती. त्यावेळी त्यांनी तारीख ठरली नसल्याचं उत्तर दिलं होतं. पण आता सूत्रांकडून मिळालेल्या नव्या माहितीनुसार, शिंदे गटाचा पुन्हा गुवाहाटी जाण्याचा मुहूर्त ठरला आहे. शिंदे गटाचे सर्व मंत्री आणि आमदार याच महिन्यात गुवाहाटीला जाणार आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटाचे सर्व आमदार हे येत्या 26-27 नोव्हेंबरला गुवाहाटीला जाणार आहेत. शिंदे गटाचे सर्व आमदार-मंत्री गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवीचं दर्शन घेणार आहेत. कामाख्या देवीच्या दर्शनासाठीच ते पुन्हा गुवाहाटीच्या दौऱ्यावर जात असल्याची माहिती समोर आलीय.

गुवाहाटी दौऱ्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार?

शिंदे-फडणवीस सरकारचा दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार हा अद्याप प्रलंबित आहे. शिंदे गटातील अनेक आमदारांना मंत्रिपदाची आशा आहे. विशेष म्हणजे काही आमदारांच्या नाराजीच्या देखील बातम्या समोर आल्या होत्या. त्यामुळे कदाचित याच विषयावर चर्चा करण्यासाठी शिंदे गट गुवाहाटीला जात असल्याची चर्चा आहे.

शिंदे गटाचे सर्व आमदार गुवाहाटीचा दौरा करुन आल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरुय. राज्य सरकारमधील मंत्र्यांकडून लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असं सांगितलं जातंय. पण त्याचा मुहूर्त अद्याप स्पष्ट करण्यात आलेला नाही. कदाचित हा मुहूर्त गुवाहाटीत कामाख्या देवीच्या दर्शनानंतरच निश्चित होण्याची शक्यता आहे.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.