Eknath Shinde: एकनाथ शिंदेंसमोर विलिनीकरण हाच एकमेव पर्याय? कायदा तज्ञ अनंत कळसेंच्या माहितीनं बंडखोरांचं टेन्शन वाढवलं

त्यांना भाजपमध्ये विलीन व्हावं लागणार अन्यथा दुसऱ्या कुठल्या तरी पक्षात एवढाच पर्याय त्यांच्यापुढे उरल्याचे सध्या तरी घटना तज्ज्ञ सांगत आहेत. हे नियम मान्य न केल्यास एकनाथ शिंदे यांच्यावर कारवाईही होऊ शकते, मात्र हा नियमांचा गुरफटा काय आहे. तोही सोप्या भाषेत समजून घेऊया...

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंसमोर विलिनीकरण हाच एकमेव पर्याय? कायदा तज्ञ अनंत कळसेंच्या माहितीनं बंडखोरांचं टेन्शन वाढवलं
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 24, 2022 | 9:30 PM

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे रोज आमच्याकडे पुरेसं सख्याबळ असल्याचा दावा करत आहेत आणि आम्हीच बाळासाहेबांची शिवसेना (Shivsena) असल्याचेही सांगत आहे. तसेच ठाकरे समर्थक शिवसेना नेत्यांनी विधानसभा अध्यक्षांना लिहिलेली पत्रं, तसेच घेतलेले निर्णय हे बेकायदेशीर असल्याचे सांगत आहे. मात्र आता एकनाथ शिंदे यांचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. कारण एकनाथ शिंदे यांनी आमदारांचं संख्याबळ जरी जमवलं असलं तरी तसा वेगळा गट त्यांना स्थापन करता येणार नाही. त्यामुळे एक तर त्यांना भाजपमध्ये (BJP) विलीन व्हावं लागणार अन्यथा दुसऱ्या कुठल्या तरी पक्षात एवढाच पर्याय त्यांच्यापुढे उरल्याचे सध्या तरी घटना तज्ज्ञ सांगत आहेत. हे नियम मान्य न केल्यास एकनाथ शिंदे यांच्यावर कारवाईही होऊ शकते, मात्र हा नियमांचा गुरफटा काय आहे. तोही सोप्या भाषेत समजून घेऊया…

विधीतज्ज्ञ काय म्हणतात?

विलीनीकरणाचा पर्यायच एकनाथ शिंदे यांच्यासमोर उपलब्ध आहे. कारण पक्षातील फूट सिद्ध करण्यासाठी मूळ पक्षात अगदी विधानसभा, लोकसभा ते जिल्हा पातळी, तालुका पातळीपर्यंत फूट पडणे गरजचे असते. अशा पद्धतीची फूट असेल तरच हे नव्या पार्टीचे सदस्य होऊ शकतात, असे घटनातज्ज्ञ अनंत कळसे सांगतात. तसेच पक्षांतराच्या कारणावरून येणारी अपात्रता विलीनीकरणाला लागू होत नाही. या सदस्यांना दोन तृत्तीयांश पक्ष हा प्रत्येक पातळीवर फुटल्याचे सिद्ध करावे लागेल, असेही नियम सांगतात. हेच नियम आता एकनाथ शिंदे यांची मोठी डोकेदुखी वाढवू शकतात.

एकनाथ शिंदे यांच्यापुढची अडचण काय?

घटनातज्त्र सांगतात त्या अर्थान पाहिल्यास आत्ता एकनाथ शिंदे यांच्याविरोधात एक मोठी अडचण तयार झाली आहे. ती म्हणजे ते आमदार तर घेऊन बाहेर पडले आहेत. मात्र जिल्हा पातळीवरील आणि तालुका पातळीवरील सर्व सदस्य हे महाराष्ट्रातच आहेत. त्यांचा किती पाठिंबा हा शिंदेंना आहे हे सांगणं सध्या तरी कठीण आहे. तसेच खासदारांचा मोठा गटही उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहे. जिल्हा प्रमुख आणि संपर्कप्रमुख तसेच विभागप्रमुख यांच्याशी उद्धव ठाकरे यांनी आजच रॅपिड बैठका घेतल्या आहेत. एवढेच काय तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी आजच बैठक घेत सर्व नगरसेवकांशीही संवाद साधला आहे. त्यामुळे हे नेते अजून तरी ठाकरेंच्या समर्थनार्थ असल्याचे शिवसेनेचे नेते सांगत आहेत आणि याचमुळे कायदेशीर प्रक्रियेत एकनाथ शिंदेंच्या अडचणी या वाढू शकतात.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.