कोण आहे गद्दार ? एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना आरसाच दाखवला, पोस्ट प्रचंड व्हायरल

Eknath Shinde and Uddhav Thackerary | विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेसंदर्भात निकाल दिला. शिवसेना आणि आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल देताना पक्ष एकनाथ शिंदे यांचा असल्याचा निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोगानंतर हा तिसरा निर्णय शिवसेनेसंदर्भात आला.

कोण आहे गद्दार ? एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना आरसाच दाखवला, पोस्ट प्रचंड व्हायरल
Follow us
| Updated on: Jan 12, 2024 | 9:51 AM

गिरीश गायकवाड, मुंबई, दि. 11 जानेवारी 2024 | शिवसेनेतून एकनाथ शिंदे बाहेर पडल्यानंतर राज्याची सूत्रे त्यांच्याकडे आली. यावेळी सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगात शिवसेना कोणाची? यासंदर्भात लढाई सुरु होती. बुधवारी दहा जानेवारी रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेसंदर्भात निकाल दिला. शिवसेना आणि आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल देताना पक्ष एकनाथ शिंदे यांचा असल्याचा निर्णय दिला. या निकालात दोन्ही गटातील कोणत्याही आमदारास अपात्र ठरवण्यात आले नाही. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आक्रमक झाले आहेत. त्यांच्या शिवसेनेकडून करण्यात आलेली एक पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यात गद्दार कोण? असा प्रश्न विचारत उद्धव ठाकरे यांना आरसा दाखवला आहे.

काय आहे पोस्ट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिकृत एक्स अकाउंटरुन ट्विट करण्यात आले आहे. त्यात चार ओळी दिल्या आहे. त्यांनी म्हटले आहे की, “आधी वाचवली शिवसेना, मग सोडवला धनुष्य. आज सिद्ध झाला निर्णय, कोण आहे गद्दार मनुष्य. !! विजय शिवसेनेचा.. विजय हिंदुत्वाचा !!”. त्याचवेळी सोबत आरसा असणारे कार्टून काढले आहे. त्यात उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे आरसा दाखवत असल्याचे दिसत आहे. एकनाथ शिंदे यांच्या या पोस्टवर युजरने अनेक कॉमेंट केल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

हे ट्विट झाले होते व्हायरल

सन २०१९ मधील एकनाथ शिंदे यांनी केलेले ट्विट चांगलेच व्हायरल झाले आहे. ते ट्विट विधानसभा निवडणुकीसाठी त्यांना शिवसेनेची उमेदवारी मिळाल्याचे आहे. ‘शिवसेनेतर्फे अधिकृत उमेदवार म्हणून एबी फॉर्म देऊन पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास दर्शवला. मा. उद्धवजी ठाकरे साहेबांचे मनस्वी आभार.’, असे त्यात म्हटले आहे. यावेळी युजरने एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. २०१८ ची घटना अमान्य मग २०१९ ची उमेदवारी कशी मान्य ? असा प्रश्न विचारला होता. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी गद्दर कोण ? असे ट्विट व्हायरल झाले आहे.

दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाच्या विरोधात उद्धव ठाकरे गट पुढील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. त्यासंदर्भात ठाकरे गटाच्या वकिलांकडून कागदपत्रांची जुळवाजुळव सुरु आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.