Sumant Ruaikar : सुमंत रुईकरच्या कुटुंबीयांची जबाबदारी शिवसेनेची, त्यांना काही कमी पडू देणार नाही : एकनाथ शिंदे

शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसैनिक सुमंत रुईकर (Sumant Ruikar) यांच्या कुटंबाची संपूर्ण जबाबदारी ठाणे जिल्हा शिवसेनेकडून येणार असल्याचं म्हटलं आहे. रुईकर यांच्या कुटुंबीयाना काही कमी पडू दिलं जाणार नाही, असं देखील एकनाथ शिंदे म्हणाले.

Sumant Ruaikar : सुमंत रुईकरच्या कुटुंबीयांची जबाबदारी शिवसेनेची, त्यांना काही कमी पडू देणार नाही : एकनाथ शिंदे
सुमंत रुईकर
Follow us
| Updated on: Dec 27, 2021 | 7:03 AM

मुंबई: शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसैनिक सुमंत रुईकर (Sumant Ruikar) यांच्या कुटंबाची संपूर्ण जबाबदारी ठाणे जिल्हा शिवसेनेकडून येणार असल्याचं म्हटलं आहे. रुईकर यांच्या कुटुंबीयाना काही कमी पडू दिलं जाणार नाही, असं देखील एकनाथ शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी शिवसैनिक सुमंत रुईकर (Sumant Ruikar) तिरुपतीकडे पायी जात होते. मित्रासह तिरुपती बालाजीकडे (Tirupati Balaji) पायी प्रवास करत निघाले होते. सुमंत रुईकर यांना तिरुपतीकडे जाताना ताप आल्यानं कर्नाटकातील रायचूर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. प्रकृती खालावल्यानं सुमंत रुईकर यांचं शनिवारी (25 डिसेंबर) दुपारी निधन झालं.

एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य मिळावं यासाठी बीडहून तिरुपती बालाजी पर्यंत पायी चालत जाण्याचा संकल्प करणारे ज्येष्ठ शिवसैनिक सुमंत रुईकर यांचे कर्नाटक मधील रायचूर येथे तब्येत बिघडल्याने अचानक निधन झालं आहे. या कट्टर शिवसैनिकाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन ही यात्रा चालू केली होती.त्यांच्या अकाली जाण्याने त्यांचे संपूर्ण कुटुंब रस्त्यावर आलं आहे.रुईकर यांच्या कुटुंबियांची संपूर्ण जबाबदारी ठाणे जिल्हा शिवसेनेकडून उचलण्यात येत आहे.त्यांना काहीही कमी पडू दिले जाणार नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

मिलिंद नार्वेकर यांच्याकडूनही मदत

शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी सुमंत रूईकर यांच्या परिवाला मदत ट्विट करून मदत दिल्याची माहिती दिली आहे. सुमंत रुईकर यांच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांना 50 हजार रुपयांची मदत पाठवत आहे तसेच आवश्यक ते सहाय्य तत्परतेने करत आहोत, असं मिलिंद नार्वेकर म्हणाले.

उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीसाठी तिरुपतीला पायी जाण्याचा संकल्प

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दीर्घायुष्य मिळावे म्हणून शिवसैनिक सुमंत रुईकर यांनी बीडमधून तिरुपतीला पायी जाण्याचा संकल्प केला होता. 1100 किमी पायी चालत जाण्याचा निश्चय त्यांनी केला होता. 1 डिसेंबरपासून ते तिरुपतीच्या दिशेने निघाले होते. उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठिक व्हावी आणि शिवसेनेला आगामी निवडणुकांमध्ये यश मिळावं म्हणून सुमंत रुईकर चालत जात होते.

तिरुपतीला पोहोचण्यापूर्वीचं मृत्यूनं गाठलं

सुमंत रुईकर आणि त्यांच्या मित्रानं पायी चालत तिरुपतीला 31 डिसेंबरला पोहोचण्याचा संकल्प केला होता. मात्र, ताप आल्यानं रुईकर यांची प्रकृती बिघडली होती. कर्नाटकमधील रायचूर येथील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं. अखेर, शनिवारी दुपारी सुमंत रुईकर यांची प्रकृती खालावल्यानं निधन झालं.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत म्हणूनही पायी यात्रा

सुमंत रूईकर यांच्या मृत्युने बीड शहरासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विविध सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रभागी असणार्‍या सुमंत रुईकर यांचा मित्र परिवार सर्व पक्षांमध्ये होता. मनमिळावू आणि प्रत्येकाच्या मदतीला धावणारे व्यक्ती म्हणून रूईकर यांच्याकडे पाहिले जात होते.सुमंत रूईकर यांनी यापूर्वीही 2019 मध्ये उध्दव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी बीड ते तिरूपती बालाजी पायी यात्रा पूर्ण केली होती. मुख्यमंत्री झाल्यानंतर उध्दव ठाकरेंनी सुमंत रुईकर यांच्या निष्ठेचे कौतुक करत सत्कार केला होता.

इतर बातम्या:

VIDEO : मुख्यमंत्र्यांच्या दीर्घायुष्यासाठी बीड-तिरुपती पायी प्रवास करणाऱ्या शिवसैनिकाला वाटेतच मृत्यूनं गाठलं

Sumant Ruikar : शिवसैनिकाची उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीसाठी पायी वारी, तिरुपतीला पोहोचण्यापूर्वीचं निधनानं बीडवर शोककळा

Eknath Shinde said Thane Shivsena will take responsibility of Sumant Ruikar who died in Karnataka when going to Tirupati by walking for better health of Uddhav Thackeray

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.