निधी वाटपात सगळ्यात जास्त निधी या आमदाराला मिळाला; मुख्यमंत्र्यांनी भरसभेत थेट नावच सांगितले…
राज्यात लॉकडाऊन केल्यानंतर परिस्थिती भयानक बनली होती. त्यामुळे त्यांनी बोलताना सांगितले की, राज्यात अडीच वर्षे सर्व काही बंद होते.

मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावोस दौऱ्यानंतर सभांचा आणि कार्यक्रमांचा मोठा धडाका लावला आहे. ज्या ज्या ठिकाणी त्यांच्या सभा आणि कार्यक्रम होत आहेत. त्या त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्यावर आणि तत्कालिन महाविकास आघाडीवर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. महाविकास आघाडी आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना एकनाथ शिंदे यांनी कोरोना काळातील सरकारच्या कामावरही टीका केली.
महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना राज्यातील सर्व काही बंद होते. मात्र आमचं सरकार आलं नसतं तर सगळं बंद झालं असते असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
निधी वाटपाबाबतही एकनाथ शिंदे यांनी आमदार प्रताप सरनाईक यांच्याबद्दल सांगत सगळ्या जास्त निधी हा प्रताप सरनाईक यांना दिला असल्याची कबुलीही एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
प्रताप सरनाईक यांच्याबद्दल गौरव करताना ते म्हणाले की, तुमचे आमदार निधी आणायला खूप हुशार आहेत. जेवढी कामं गेल्या काही वर्षात झालेली आहेत,
मात्र मला वाटते की, मतदार संघात प्रताप सरनाईक यांच्याकामाएवढी कोणत्याही मतदार संघात कामं झाली नाहीत असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर काही दिवसांनी कोरोनाचे संकट राज्यावर आले. त्याचा फटका राज्याला मोठ्या प्रमाणात बसला होता.
त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घरातूनच राज्यावर लक्ष ठेवत कोरोना संकटाचा सामना करण्यास लोकांना मदत केली.
राज्यात लॉकडाऊन केल्यानंतर परिस्थिती भयानक बनली होती. त्यामुळे त्यांनी बोलताना सांगितले की, राज्यात अडीच वर्षे सर्व काही बंद होते,
आमचं सरकार आलं नसतं तर सगळं बंद झालं असतं कारण चायनामध्ये कोरोना आला होता असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला होता.