Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदे यांचं सर्वात स्फोटक विधान, तरीही ते गौप्यस्फोटासाठी कोणत्या वेळीची वाट बघत आहेत?

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि गिरीश महाजनांच्या (Girish Mahajan) अटकेचा डाव महाविकास आघाडी सरकारमध्ये होता, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. शिंदे एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी वेळ आल्यावर पूर्ण बोलणार असल्याचा इशाराही दिलाय.

एकनाथ शिंदे यांचं सर्वात स्फोटक विधान, तरीही ते गौप्यस्फोटासाठी कोणत्या वेळीची वाट बघत आहेत?
Follow us
| Updated on: Feb 28, 2023 | 9:19 AM

मुंबई : “उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना जेलमध्ये टाकण्यासाठीचे उद्योग सुरु होते आणि हे मलाही माहिती आहे”, असं स्फोटक विधान खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) केलंय. “ठाकरे सरकारमध्ये काय उद्योग सुरु होते, हे आत्ताच सांगणार नाही”, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी इशाराही दिलाय. पण ठाकरे गटानं शिंदेंचा हा दावा, तात्काळ फेटाळत मुख्यमंत्री खोटं बोलत असल्याचं खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणालेत.

देवेंद्र फडणवीसांच्या अटकेच्या शक्यतेबद्दल, आत्ताच मोठा गौप्यस्फोट झाला असं नाही. तर स्वत: फडणवीसांनी TV9च्या कार्यक्रमात कशाप्रकारे जेलमध्ये टाकण्याचा डाव रचण्यात आला होता, असं सांगितलं होतं. पण आता शिंदेंनी सार्वजनिकपणे त्यावर भाष्य केलं. विशेष म्हणजे त्यावेळी एकनाथ शिंदे ठाकरेंसोबत होते आणि महाविकास आघाडी सरकारचाच भाग होते.

देवेंद्र फडणवीसांबरोबरच आणखी एक नाव समोर आलंय, ते नाव म्हणजे भाजपचे संकटमोचक अशी ओळख असलेले गिरीश महाजन. भाजपला बॅकफूटवर टाकण्यासाठी गिरीश महाजनांनाही जेलमध्ये टाकण्याचे प्रयत्न सुरु होते, असं मुख्यमंत्री म्हणालेत.

हे सुद्धा वाचा

गेल्या वर्षी विधानसभेत तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी पेनड्राईव्ह बॉम्ब टाकत, एकप्रकारे स्टिंग ऑपरेशनच समोर आणलं होतं. ज्यात त्यावेळचे सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या मदतीनं, महाजनांना अटक करण्याचा प्लॅन होता, असा आरोप फडणवीसांनी केला होता.

पण यावर बोलताना गिरीश महाजनांनी, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंचंही नाव घेतलंय. फडणवीस आणि गिरीश महाजनांचे याआधीचे आरोप महाविकास आघाडीनं फेटाळलेत. आता शिंदेंच्या वक्तव्यानंतरही, अटकेच्या षडयंत्राचा पुन्हा संजय राऊतांनीही इन्कारच केलाय. पण खुलासा करण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे योग्यवेळी वाटत पाहत आहेत.

आणखी एक अहवाल अन् मोठा खुलासा समोर, 'दीनानाथ' रूग्णालयावर ठपका
आणखी एक अहवाल अन् मोठा खुलासा समोर, 'दीनानाथ' रूग्णालयावर ठपका.
कर्जमाफी साठी मुहूर्त शोधताय का? बच्चू कडू संतापले
कर्जमाफी साठी मुहूर्त शोधताय का? बच्चू कडू संतापले.
त्यांच्या डोक्यातील हिरोईन मला माहीत, विजय वडेट्टीवारांचा कोणाला टोला?
त्यांच्या डोक्यातील हिरोईन मला माहीत, विजय वडेट्टीवारांचा कोणाला टोला?.
तहव्वुर राणाचा फेस्टिवल करू नका; राऊतांचा भाजपला टोला
तहव्वुर राणाचा फेस्टिवल करू नका; राऊतांचा भाजपला टोला.
गीतांजली एक्स्प्रेसमध्ये IRCTC कर्मचाऱ्यांकडून दादागिरी अन् मारहाण....
गीतांजली एक्स्प्रेसमध्ये IRCTC कर्मचाऱ्यांकडून दादागिरी अन् मारहाण.....
'एमआयएम'चे जलील ठाकरेंच्या भेटीला 'मातोश्री'वर
'एमआयएम'चे जलील ठाकरेंच्या भेटीला 'मातोश्री'वर.
स्त्रियांसाठी पहिली शाळा फुलेंनी नाही तर... उदयनराजेंचं मोठं वक्तव्य
स्त्रियांसाठी पहिली शाळा फुलेंनी नाही तर... उदयनराजेंचं मोठं वक्तव्य.
आमदार संतोष बांगर संभाजीनगरच्या डॉक्टरवर संतापले; ऑडिओ क्लिप व्हायरल
आमदार संतोष बांगर संभाजीनगरच्या डॉक्टरवर संतापले; ऑडिओ क्लिप व्हायरल.
गवर्नर हाऊसच्या जागेत छत्रपती शिवाजी महाराजांचं राष्ट्रीय स्मारक व्हाव
गवर्नर हाऊसच्या जागेत छत्रपती शिवाजी महाराजांचं राष्ट्रीय स्मारक व्हाव.
''ते कुत्रं इथलं तरी आहे का? जास्त कौतुक कशाला' उदयनराजे पुन्हा भडकले
''ते कुत्रं इथलं तरी आहे का? जास्त कौतुक कशाला' उदयनराजे पुन्हा भडकले.