Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट | नवे मंत्री कोण? कुणाची मंत्रिपदं जाणार?

बहुप्रतिक्षित शिंदे-भाजप सरकारचा येत्या जुलैच्या पहिल्या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या विस्तारावेळी केंद्रातही शिंदेंच्या 2 खासदारांना मंत्रिपदं मिळण्याचं बोललं जातंय.

Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट | नवे मंत्री कोण? कुणाची मंत्रिपदं जाणार?
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 30, 2023 | 10:27 PM

मुंबई : वर्षभरानंतर का होईना, शिंदे-भाजप सरकारचा जुलैच्या पहिल्या आठवड्यात विस्तार होणार आहे. स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिलीय. सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला केंद्रात 2 मंत्रीपदं दिली जाणार आहेत. त्यामोबदल्यात कोणत्या 2 जणांची मंत्रिपदं जाणार? हे पाहणं महत्वाचं आहे. तर राज्यात नव्या चार जणांना संधी देताना शिंदे गटाच्या विद्यमान चार मंत्र्यांना डच्चू दिला जाणार, असल्याचं बोललं जातंय.

सूत्रांच्या माहितीनुसार कृषीमंत्री अब्दुल सत्तार, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत या चार जणांच्या मंत्रीपदावर टांगती तलवार आहे. कारण भ्रष्टाचारासह इतर वेगवेगळ्या कारणांनी या मंत्र्यांकडचे खाते वादात सापडले आहेत.

‘या’ नेत्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता

या चार मंत्र्यांऐवजी शिंदेंच्या शिवसेनेतून भरत गोगावले, संजय शिरसाट, अनिल बाबर आणि मित्रपक्षातून बच्चू कडू यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय. दरम्यान वर्षभर बावीसहून अधिक मंत्रिपदं रिक्त असताना एकाच व्यक्तींकडे 8-8 खाते कसे? असं म्हणत मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल बच्चू कडूंनी हताशपणे प्रतिक्रिया दिलीय.

हे सुद्धा वाचा

‘या’ नेत्यांनी केला मंत्रीपदासाठी दावा

शिंदेंकडे मुख्यमंत्रीपदासह सामान्य प्रशासन, नगरविकास, माहिती तंत्रज्ञान, माहिती-जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम, परिवहन, पणन, सामाजिक न्याय, मदत पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन, अशी दहा खाती आहेत. तर फडणवीसांकडे गृह, अर्थ, विधी व न्याय, जलसंपदा, गृहनिर्माण, उर्जा आणि राजशिष्टाचार अशी 7 खाती आहेत.

भरत गोगावलेंनी याआधीच आपलं मंत्रिपद पक्क म्हणून दावा केलाय. आमदार संतोष बांगर यांनाही मंत्रिपदाची आशा आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी सुद्धा त्यांच्या पक्षासाठी मंत्रीपद मागितलंय. आमदार नरेंद्र बोडेंकरांच्या समर्थकांनीही भावी मंत्री म्हणून बॅनर झळकावले आहेत.

22 मंत्रिपदं रिक्त

बरोब्बर वर्षभरापूर्वी शिंदे-भाजप सरकार स्थापन झालं. 30 जूनला शिंदे-फडणवीसांचा शपथविधी झाला. पहिले चाळीस दिवस फक्त मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसच कारभार चालवत होते. 9 ऑगस्ट 2022 च्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदेंच्या शिवसेनेचे 9 आणि भाजपच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली. सध्या महाराष्ट्रात एकूण 22 मंत्रिपदं रिक्त आहेत.

गेल्या वर्षभरापासून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसहीत फक्त 20 मंत्री महाराष्ट्र सरकार चालवतायत. त्यामुळे वर्षभरानंतर होणाऱ्या या विस्तारात कुणाला स्थान मिळतं हे पाहणं महत्वाचं असेल. दरम्यान मंत्रिमंडळ विस्तारावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर वारंवार टीका आणि टोमणे मारले आहेत. त्यामुळे जुलै महिन्यात तरी मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त लागतो का? हे पाहणं महत्वाचं असेल.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.