पेट्रोल महागले, सीएनजीतही वाढ; आता मुंबईकरांना लवकरच बसणार वीज दरवाढीचा शॉक?

महाराष्ट्र वीज नियामक आयोग (Maharashtra Electricity Regulatory Commission) नवीन नियामक आराखडा आणणार असून, या आराखड्याला मंजुरी मिळाली तर येणाऱ्या काळात मुंबईमध्ये (mumbai) वीज (Electricity) महाग होऊ शकते.

पेट्रोल महागले, सीएनजीतही वाढ; आता मुंबईकरांना लवकरच बसणार वीज दरवाढीचा शॉक?
संग्रहित छायाचित्र
Follow us
| Updated on: Apr 07, 2022 | 12:24 PM

मुंबई : महाराष्ट्र वीज नियामक आयोग (Maharashtra Electricity Regulatory Commission) नवीन नियामक आराखडा आणणार असून, या आराखड्याला मंजुरी मिळाली तर येणाऱ्या काळात मुंबईमध्ये (mumbai) वीज (Electricity) महाग होऊ शकते. मुंबईकरांना वीज दरवाढीचा शॉक बसू शकतो. बेस्ट, टाटा पॉवर, अदानी आणि एमईडीसीएलसारख्या वीज कंपन्यांचा दैनंदिन खर्च वाढला आहे. दैनंदिन भांडवली खर्चासाठी गुंतवणुकीची गरज असल्याच्या पार्श्वभूमीवर हा नवा आराखडा नियामक आयोगाने तयार केला असल्याची माहिती समोर येत आहे. जर या आराखड्याची अंमलबजावणी झाली तर मुंबईकरांना वीजबिलाच्या रुपात मोठा फटका बसू शकतो. भूमिगत टाकण्यात आलेल्या वीज वाहिन्यांसाठी किंवा नव्याने जोडण्यात येणाऱ्या वीज वाहिन्यांसाठी वीज कंपन्यांना मोठ्याप्रमाणात खर्च येणार आहे. यातील पन्नास टक्के खर्च हा ग्राहकांच्या खिश्यातून वसूल करण्याचा प्रयत्न या नव्या प्रस्तावात आहे.

असा असेल नवा आराखडा

महाराष्ट्र वीज नियामक आयोग वीजबिलाबाबत नवा नियामक आराखडा आणण्याचा तयारीत आहे. या आराखड्याची अंमलबजावनी सुरू झाल्यास मुंबईमध्ये वीजबिल आणखी महाग होणार आहे. सध्या वीज कंपन्यांना जे नुकसान होत आहे, ते नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न या आराखड्यातून करण्यात येणार आहे. भूमिगत टाकण्यात आलेल्या वीज वाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी तसेच नव्याने देण्यात येणाऱ्या वीजेच्या सुविधेसाठी कंपन्यांचा मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. परिणामी कंपन्या तोट्यात जात असून, आता हा तोटा नवीन आराखड्यानुसार ग्राहकांच्या खिश्यातून भरला जाणार आहे. कंपनीचा अर्धा खर्च हा ग्राहकांच्या खिशातून वसूल करण्यासाठी लवकच मुंबईमध्ये वीज दरवाढ होऊ शकते. नव्या आराखड्यावर ग्राहकांच्या सूचना आणि हरकती मागवण्यात आल्या आहेत.

विजेची मागणी वाढली

विजेची वाढती मागणी आणि टंचाईमुळे कोळसा महाग झाल्याने इंधन समाजोयन आकार म्हणून शुल्कवाढ होण्याची शक्यता आहे. याचा मोठा फटका हा बेस्ट आणि टाटाच्या सुमारे 18 लाख ग्राहकांना बसू शकतो. मुंबईत औष्णिकसह 180 मेगावॅट वायू 440 मेगावॅट जलिद्युत्त आणि 350 मेगावॅट वीज हरीत ऊर्जा स्त्रोतांकडून पुरवली जात आहे. या माध्यमातून वीजदरवाढ टाळण्याचा प्रयत्न असल्याचे टाटा पॉवरने म्हटले आहे. मात्र तरी देखील येणाऱ्या काळात वीजदर वाढ होण्याची दाट शक्यता असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.

संबंधित बातम्या

धनादेश फसवणुकीला ‘पीएनबी’चा चाप ! ग्राहकांसाठी सुरु केली खास सुविधा

CNG Price Hike : सुटकेचा गुरुवार, पेट्रोल-डिझेलचे भाव स्थिर, सीएनजीचे भाव मात्र 3 रुपयाने वाढले

ऑनलाईन कर्ज देणाऱ्या अ‍ॅपची न्यायालयाकडून गंभीर दखल, अ‍ॅपवर नियंत्रण कधी येणार? ‘आरबीआयला’ सवाल

महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले...
महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले....
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'.
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.