Stan Swamy Death: कोण होते फादर स्टॅन स्वामी?; वाचा सविस्तर
मानवाधिकार कार्यकर्ते आणि भीमा कोरेगाव हिंसा प्रकरणी अटकेत असलेले फादर स्टॅन स्वामी यांचं आज निधन झालं. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा निरोप घेतला. (stan swamy)
मुंबई: मानवाधिकार कार्यकर्ते आणि भीमा कोरेगाव हिंसा प्रकरणी अटकेत असलेले फादर स्टॅन स्वामी यांचं आज निधन झालं. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा निरोप घेतला. स्वामींवर ते नक्षली चळवळीशी संबंधित असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे त्यांच्यावर यूएपीए अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. कोण होते फादर स्टॅन स्वामी? त्यावर टाकलेला हा प्रकाश. (Elgar Parishad case: Who was Stan Swamy?, know details)
दहशतवादाचा आरोप असलेले स्टॅन स्वामी हे भारतातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती असल्याचं सांगितलं जातं. जानेवारी 2018मध्ये पुण्यात भीमा कोरेगाव येथे हिंसा भडकली होती. त्यानंतर पोलिसांनी धरपकड सुरू केली. एनआयएने स्वामींना गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये अटक केली होती. नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. तसेच त्यांच्यावर यूएपीए अंतर्गत अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते.
समाजशास्त्राचे अभ्यासक
स्टॅन स्वामींचं जन्म 26 एप्रिल 1937 रोजी तामिळनाडूच्या त्रिची येथे झाला. त्यांचे वडील शेतकरी होते. आई गृहिणी होती. त्यांनी समाजशास्त्रात एमए केलं होतं. त्यानंतर त्यांनी बंगळुरूच्या इंडियन सोशल इन्स्टिट्यूटमध्ये काम केलं. नंतर झारखंडमध्ये आल्यावर त्यांनी आदिवासी आणि वंचितांसाठी काम सुरू केलं होतं.
आदिवासींच्या हक्कासाठी संघटना स्थापन
सुरुवातीला त्यांनी पाद्री म्हणून काम पाहिलं. झारखंडमध्ये आदिवासींनी त्यांच्या अधिकारासाठी संघर्ष सुरू केला होता. त्यावेळी स्वामींनी झारखंडमध्ये विस्थापन विरोधी जनविकास आंदोलन या संघटनेची स्थापना करून मानवाधिकार कार्यकर्ता म्हणून कामास सुरुवात केली. दलित आणि आदिवासींच्या हक्कासाठी ही संघटना कार्यरत आहे. रांचीच्या नामकुम क्षेत्रात आदिवासी मुलांसाठी ते शाळा आणि टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यू चालवत होते. पत्थलगढी आंदोलनात जमावाला भडकावल्याचा आणि सरकार विरोधी विधानं केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. त्यामुळे झारखंडच्या पोलीस ठाण्यात स्वामींसह 20 जणांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
भीमा कोरेगाव प्रकरण काय आहे?
पुण्यात 2018मध्ये एल्गार परिषदेने एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्यानंतर भीमा कोरेगाव परिसरात हिंसा उसळली होती. त्यावेळी अनेक दुकाने आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. त्यात एकाचा मृत्यूही झाला होता. या घटनेप्रकरणी अनेकांची धरपकड करण्यात आली होती. नक्षलवाद्यांशी संपर्क असल्याच्या कारणावरून अनेकांना अटक करण्यात आली होती. त्यात स्टॅन यांचाही समावेश होता. फादर स्टॅन आणि त्यांचे सहकारी बंदी असलेल्या माकपा (माओवादी) या संघटनेशी संबंधित असल्याचा त्यांच्यावर एनआयएने आरोप केला होता. तसेच एक प्रतिज्ञापत्रं सादर करून एनआयएने स्टॅन यांच्या जामिनाला विरोध केला होता. स्टॅन यांच्या आजाराचा काहीही ठोस पुरावा नाही. स्टॅन हे माओवादी असून देशात अशांतता निर्माण करण्यासाठी ते षडयंत्र रचत होते, असा दावा एनआयएने केला होता.
आरोप काय?
स्वामींवर एल्गार परिषदेत चिथावणीखोर भाषण दिल्याचा आरोप आहे. तसेच नक्षलवादी संघटनेशी संबंधित असल्याचाही आरोप आहे. हा आरोप त्यांनी फेटाळला होता. गेल्या वर्षी स्वामींनी एक व्हिडीओ जारी करून सर्व आरोप फेटाळून लावले होते. एनआयएने माझ्यासमोर अनेक आरोप ठेवले. नक्षलवाद्यांशी माझा संबंध असल्याचं दाखवणारी ही कागदपत्रं होती. मात्र, हे एक षडयंत्र आहे. कोणी तरी चोरून माझ्या कॉम्प्युटरमध्ये ही कागदपत्रं टाकली आहेत, असा दावा त्यांनी केला होता. (Elgar Parishad case: Who was Stan Swamy?, know details)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 5 July 2021 https://t.co/O0EiZA3kdM #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 5, 2021
संबंधित बातम्या:
Stan Swamy Death: भीमा-कोरेगाव हिंसाप्रकरणात अटकेत असलेले फादर स्टॅन स्वामींचं निधन
कोरेगाव भीमा दंगल हे फडणवीस सरकारचं षडयंत्र, पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र : सूत्र
भीमा कोरेगावला भीम आर्मी आणि ब्राह्मण महासंघ आमनेसामने?
(Elgar Parishad case: Who was Stan Swamy?, know details)