‘टेस्लाची महाराष्ट्राऐवजी बंगळुरूला पसंती, शिवसेनेच्या पेज 3 मंत्र्याला झटका’

काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी ट्विटवरून आपण टेस्ला कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतल्याची माहिती दिली होती. | Aditya Thackeray Tesla

'टेस्लाची महाराष्ट्राऐवजी बंगळुरूला पसंती, शिवसेनेच्या पेज 3 मंत्र्याला झटका'
शिवसेना विरुद्ध मनसे सामना रंगला
Follow us
| Updated on: Jan 13, 2021 | 2:08 PM

मुंबई: इलेक्ट्रिक कारची (Electric car) निर्मिती करणाऱ्या ‘टेस्ला’चा प्रकल्प महाराष्ट्राऐवजी बंगळुरुत गेल्याच्या मुद्द्यावरुन मनसेकडून शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना लक्ष्य करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी ट्विटवरून आपण टेस्ला कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतल्याची माहिती दिली होती. या भेटीनंतर ‘टेस्ला’चा प्रकल्प महाराष्ट्रातच येईल, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला होता. (MNS targets Aditya Thackeray over Tesla project go into Bengaluru)

मात्र, आता टेस्लाचा प्रकल्प कर्नाटकात गेल्याने मनसेकडून आदित्य ठाकरे यांना लक्ष्य करण्यात येत आहे. टेस्ला कंपनी कर्नाटकात पळाली. पेज 3 मंत्र्यांना झटका. ‘बोलाची कढी, बोलाचा भात’, असे खोचक ट्विट मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे.

अखेर टेस्लाचे भारतात आगमन

जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि उद्योजक एलॉन मस्क यांची इलेक्ट्रिक कार बनवणारी कंपनी ‘टेस्ला’ची भारतात एन्ट्री झाली आहे. कंपनीने कर्नाटकातील बंगळुरुमध्ये टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या नावाने नोंदणी केली आहे. कंपनी इथे लक्झरी इलेक्ट्रिक कारची निर्मिती आणि व्यवसाय करणार आहे. बंगळुरुतील एका रिसर्च अँड डेव्हलपमेंट युनिटसह कंपनी आपल्या कामाला सुरुवात करणार आहे.

एलॉन मस्क यांनी काही दिवसांपूर्वी ट्विट करत भारतात व्यवसाय सुरु करणार असल्याचे जाहीर केले होते. टेस्लाचे मॉडेल ३ भारतात सर्वप्रथम लाँच केले जाईल. हे टेस्लाचे सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार मॉडेल आहे. याची किंमत 55 लाख इतकी आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत या कारचे बुकिंग सुरु होईल.

संबंधित बातम्या:

2021 मध्ये येणार जबरदस्त इलेक्ट्रिक कार, एकदाच चार्ज करून 500 किमी धावणार

Toyota कडून सर्वात छोटी इलेक्ट्रिक कार लाँच, एकदा चार्ज केल्यावर 150 किमी धावणार, किंमत फक्त…

आता इलेक्ट्रिक कार चार्ज करावी लागणार नाही, ही कंपनी बॅटरी स्वॅपिंग सर्व्हिस सुरु करणार

(MNS targets Aditya Thackeray over Tesla project go into Bengaluru)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.