ED कार्यालयाचा नवीन पत्ता, जिथे ड्रग्ज तस्कर मिरचीने पब थाटला, तिथेच ईडीचे नवे ऑफिस

ही जागा कोणे एके काळी गँगस्टर इकबाल मेमन उर्फ इकबाल मिरची (Iqbal Mirchi) याने विकत घेतली होती. मात्र जप्तीच्या कारवाईनंतर ईडीचे नवे कार्यालय सीजे हाऊसमध्ये (Ceejay House) हलवण्यात येणार आहे.

ED कार्यालयाचा नवीन पत्ता, जिथे ड्रग्ज तस्कर मिरचीने पब थाटला, तिथेच ईडीचे नवे ऑफिस
ईडीचे विद्यमान कार्यालय
Follow us
| Updated on: Jan 10, 2022 | 8:10 AM

मुंबई : शरद पवार, एकनाथ खडसे, राज ठाकरे, संजय राऊत यांच्यासारख्या दिग्गज राजकीय नेत्यांपासून ऐश्वर्या राय, यामी गौतम, रकुलप्रीतपर्यंत अनेक बॉलिवूड कलाकारांची गेल्या काही वर्षांत अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीकडून (ED) चौकशी झाली आहे. त्यामुळेच मुंबईतील ‘ईडी’चे कार्यालयही चर्चेच्या केंद्रस्थानी आले होते. परंतु हेच ईडी ऑफिस लवकरच वरळीतील प्राईम लोकेशनला शिफ्ट होणार आहे.

महत्त्वाचं म्हणजे, ही जागा कोणे एके काळी गँगस्टर इकबाल मेमन उर्फ इकबाल मिरची (Iqbal Mirchi) याने विकत घेतली होती. मात्र जप्तीच्या कारवाईनंतर ईडीचे नवे कार्यालय या सीजे हाऊसमध्ये (Ceejay House) हलवण्यात येणार आहे. हे कार्यालय एका प्रसिद्ध राजकीय नेत्याने बांधल्याची माहिती आहे. ईडीचं सध्याचं झोनल ऑफिस मुंबईतील बॅलार्ड इस्टेट परिसरातील कैसर ए हिंद इमारतीच्या तळ मजल्यावर आहे.

काय आहे सीजे हाऊसचा इतिहास?

सीजे हाऊस हे वरळी विभागातील डॉ. अॅनी बेझंट रोडवर आहे. पूर्वी ते एम के मोहम्मद यांच्या मालकीचं होतं. मात्र, या जागेचा मालक आणि मोहम्मद यांच्या कुटुंबियात वाद होता. गँगस्टर इकबाल मिरची याने 1986 साली ही जागा दोन लाख रुपयांना त्याची पहिली पत्नी हजरा हिच्या नावावर विकत घेतली. यानंतर आजूबाजूची जागा बळकावून त्याने त्या जागेत फिशरमन वोर्फ (Fisherman’s Wharf Pub) नावाचा पब सुरु केला. 1990 च्या काळात इकबाल मिरची हा ड्रग्जचा मोठा तस्कर होता. यंत्रणा त्याच्या मागावर होती. 1993 सालात मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात ही त्याचं नाव घेतलं जात होतं.

मिरचीच्या कुटुंबावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा

दरम्यान, यंत्रणेने कारवाई सुरु केली आणि मिरचीचा पब जप्त केला. हीच जागा पुढे मिरची याने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने मिलेनियन डेव्हलपरला विकली. मिलेनियन डेव्हलपरने या ठिकाणी सीजे हाऊस उभारले आहे. जागेच्या विक्रीच्या व्यवहारात मिरची याच्या कुटुंबियांना इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर नऊ हजार चौरस फूट, तर पाचव्या मजल्यावर पाच हजार चौरस फूट जागा देण्यात आली होती. या प्रकरणात ईडीने कारवाई केली आहे. इकबाल मिरची याच्या कुटुंबावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या या अनुषंगाने इमारतीतील जागा जप्त करण्यात आली. आता या जागेचा लिलाव करण्याऐवजी इमारतीत ईडी आपलं विभागीय कार्यालय थाटणार आहे.

संबंधित बातम्या :

समीर वानखेडेंची बदली, NCB च्या विभागीय संचालकपदी कोणाची वर्णी?

बादशाह मलिकला 24 डिसेंबरपर्यंत ईडी कोठडी, मनी लाँड्रिंग प्रकरणी कारवाई

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.