सत्ता संघर्षावरील निकाल उद्या लागणार, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया काय?

मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या सर्वांना या निकालाची उत्कंठा आहे. परंतु, याचा अर्थ सर्व जण धास्तावलेले आहेत, असं काही नाही. जो काही निर्णय राहील तो आम्हाला मान्य राहणार असल्याचं शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी सांगितलं.

सत्ता संघर्षावरील निकाल उद्या लागणार, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया काय?
Follow us
| Updated on: May 10, 2023 | 5:12 PM

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातली मोठी बातमी समोर आली. उद्या सत्तासंघर्षावरील निकाल येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. यासंदर्भात बोलाताना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट म्हणाले, कायदेशीर बाबी आम्ही तपासल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आमच्या बाजूने लागेल, अशी अपेक्षा आहे. सत्ता संघर्षावर उद्या पडदा पडणार आहे. ज्यांनी त्यांनी आपल्याला आपल्या पद्धतीनं मत मांडण्यास सुरूवात केली. 16 आमदारांच्या यादीतील मी एक आमदार आहे. सर्वांना निकालाची उत्सुकता आहे. याचा अर्थ सर्वजण टीव्ही समोर बसतील, असा नव्हे. सर्व जण आपआपल्या कामात व्यस्त आहेत. मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या सर्वांना या निकालाची उत्कंठा आहे. परंतु, याचा अर्थ सर्व जण धास्तावलेले आहेत, असं काही नाही. जो काही निर्णय राहील तो आम्हाला मान्य राहणार असल्याचं शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी सांगितलं.

निकाल सर्वांना मान्य करावा लागेल

आज उठलो आणि उद्या जावून उठाव केला, असं झालं नाही. सर्व बाजूंनी विचार करून निर्णय घेतला. निवडणूक आयोगानं आमच्या बाजूनं निकाल दिला. सुप्रिम कोर्टाचा निकाल आमच्या बाजूनं लागेल. उद्याचा निकाल बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार लागणार आहे. सुप्रिम कोर्ट उद्या काय निकाल देतो हे पाहणं महत्वाचं आहे. घटनेच्या चौकटीतील हा निकाल असणार आहे. जो सुप्रिम कोर्टाचा निकाल लागेल तो सर्वांना मान्य करावा लागेल.

हे सुद्धा वाचा

याची चिंता आम्हाला आहे

सत्ता राहणार की जाणार उद्या ठरेलं. उद्या आमच्या बाजूनं निकाल लागेल, असं वाटतं. १६ आमदार अपात्र झाले तर काय याची चिंता आम्हाला आहे. कोण-कोण आमच्या संपर्कात आहेत. त्यांना पक्षात घ्यायचं की नाही, याची चिंता आम्हाला आहे. सर्व खुलासे उद्या होणार आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहणे सोडावे

शरद पवारांनी भाकरी परतवली. अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदाचे स्वप्न बघणं सोडलं तर बरं होईल. जो काही निर्णय राहील तो आम्हाला मान्य राहील. आमच्या बाजूनं निकाल लागला की दबावात निकाल असं म्हणतील. आरोप करणं हा त्यांचा धंदा त्यांच्याकडे आम्ही पाहत नाही, अस संजय शिरसाट यांनी म्हंटलं.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.