Raj Thackeray Interview: सदा सरवणकर भेटायला आले होते, पण का भेटलो नाही…राज ठाकरे यांनी सांगितले ते कारण
Raj Thackeray Interview:विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा काय करायची. शिंदेंची ही पहिली निवडणूक आहे. माझी चौथी पाचवी आहे. शिंदे ज्या पक्षात होते तेव्हा ठाणे बघायचे. आज पहिल्यांदा ते निवडणूक लढत आहेत. चर्चा काय करायची. माझा विषय अमित नाहीच आहे. तुम्ही एका जागेवर का येता.
MNS Chief Raj Thackeray: विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरु असताना राज ठाकरे यांची मुलाखत सोमवारी ”टीव्ही 9 मराठी”वरील प्रसारीत झाली. त्यावेळी विविध प्रश्नांवर राज ठाकरे यांनी उत्तर दिले. माहीममध्ये राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणूक मैदानात आहे. त्यावर राज ठाकरे यांनी मत व्यक्त केले. ते म्हणाले, आदित्य ठाकरे यांच्याबाबतीत घरचा उमेदवार म्हणून पाठिंबा दिला होता. लोकसभेत भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यावेळी अमित ठाकरे हा विषय नव्हता. अमित ठाकरे हा विषय दोन आठवड्यापूर्वीचा आहे. त्यांनी स्वत:हून पाठिंबा दिला असता तर समजू शकलो असतो. पण आम्ही मागणे चुकीचे आहे. मला सदा सरवणकर भेटायला आले होते. परंतु मी भेटलो नाही. कारण त्यांच्याशी काय बोलणार? त्यांच्याशी काय चर्चा करणार? हा किरकोळ विषय आहे, हा संपलेला विषय आहे, असे राज ठाकरे यांनी सोमवारी विशेष मुलाखतीत सांगितले. ”टीव्ही 9 मराठी”चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी ही मुलाखत घेतली.
अमित ठाकरे याचे नाव आठ दिवसांपूर्वीच आले
आदित्य ठाकरेच्या बाबत मी केले ते गुड जेश्चरमधून केले. आमच्या घरातील व्यक्ती उभी होती. म्हणून त्यांना उमदेवार दिला नाही. लोकसभेला मी बिनशर्त पाठिंबा दिला. त्यात काही शर्त नव्हती. विधानसभेला पाठिंबा द्या असे सांगितले नव्हते. मी गुढी पाडव्याच्या सभेला सांगितले होते की, मी मोदींना पाठिंबा देतोय. विधानसभेच्या कामाला लागा, असे सांगितले. तेव्हाच आम्ही स्वबळावर लढणार हे स्पष्ट झाले. त्यावेळी अमितचा विषय नव्हता.
आठ दिवसांपूर्वी अमितचे नाव आले. त्यांनी उमेदवार देणे न देणे हे योग्य नाही. त्यांनी गुड जेश्चरमध्ये पाठिंबा द्यायला हवा होता. सरवणकर भेटायला आले. मी काय बोलू? केसरकर आले त्यांना मी काय सांग. उलट निर्णय त्यांनीच घ्यायचा होता. मी काही गोष्टी पाळत आलो याचा अर्थ कुणी पाळाव्या की नाही हे सांगू शकत नाही.
शिंदे यांची ही पहिलीच निवडणूक
विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा काय करायची. शिंदेंची ही पहिली निवडणूक आहे. माझी चौथी पाचवी आहे. शिंदे ज्या पक्षात होते तेव्हा ठाणे बघायचे. आज पहिल्यांदा ते निवडणूक लढत आहेत. चर्चा काय करायची. माझा विषय अमित नाहीच आहे. तुम्ही एका जागेवर का येता.