BMC Election 2022: धारावीतील अडथळे तीन महिन्यांत दूर करणार, सरकारी जमिनीवरील झोपडपट्टीवासियांनाही देणार हक्क्काचे घर, मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी फडणवीसांची घोषणा

सामान्य माणसाचं स्वप्न आपण पूर्ण करणार आहोत. धारावीतील अडथळे तीन महिन्यात दूर करू. सरकारी जमिनीवर झोपडपट्टीवासियांना घरे देणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

BMC Election 2022: धारावीतील अडथळे तीन महिन्यांत दूर करणार, सरकारी जमिनीवरील झोपडपट्टीवासियांनाही देणार हक्क्काचे घर, मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी फडणवीसांची घोषणा
भगवा फडकणारच - फडणवीस Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Aug 20, 2022 | 1:49 PM

मुंबई- मुंबई महापालविका निवडणुकांचं (BMC election 2022) रणशिंग आज भाजपाने फुंकले आहे. आगामी मुंबई महापालिका नवडणुकीत भाजपाचा भगवा मुंबई महापालिकेवर फडकणारच असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadanvis)यांनी व्यक्त केला आहे. आशिष शेलार (Ashish Shelar) यांचा स्ट्राईक रेट चांगला आहे, असे सांगत 2017 च्या मुंबई महापालिका निवडणुकीपेक्षा अधिक चांगले यश यावेळी मिळेल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. गेल्या अडीच वर्षांत उद्धव ठाकरे सरकारने मुंबईकर आणि धारावीचा प्रश्न सोडवला नाही तो येत्या तीन महिन्यांत सोडवू असा विश्वासही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. तसेच सरकारी जमिनीवर झोपड्या असलेल्यांनाही हक्काची घरे देणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

धारावीतील अडथळे तीन महिन्यांत दूर करु -फडणवीस

धारावीचा विकास करणार आहोत. केंद्र आणि राज्याच्या भूखंडावरील समस्या दूर करू. मुंबईकरांना हक्काचं घर मिळावं म्हणून सरकार प्रयत्न करणार. रिडेव्हल्पमेंटमध्ये भाडं मिळत नाही. आता पुनर्विकासात भाडं मिळणं बंधनकारक करणार आहोत. आपण सर्व रखडलेला विकास पूर्ण करणार आहोत. सामान्य माणसाचं स्वप्न आपण पूर्ण करणार आहोत. धारावीतील अडथळे तीन महिन्यात दूर करू. सरकारी जमिनीवर झोपडपट्टीवासियांना घरे देणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

मुंबई महापालिकेत भाजपाचाच महापौर – फडणवीस

2017 च्या  निवडणुकीनंतरही आपण महापौर बसवू शकलो असतो. आपली तयारी झाली होती. पण मित्र पक्षासाठी दोन पावलं मागे गेलो आणि त्यांना महापौर बनवू दिला. आता आपलाच महापौर बसेल. शिवसेना भाजप युतीचा महापौर बसेल. आपला भगवा महापालिकेवर लावल्याशिवाय राहणार नाही. आशिष तुम्ही क्रिकेट खेळणारे आहात आणि जाणाणारे आहात. त्यामुळे तुम्हाला ट्वेंटी ट्वेंटी कशी खेळायची आणि जिंकायची तुम्हाला माहीत आहे. हा सामना तुम्ही जिंकणारच आहात. असेही फडणवीस यांनी सांगितले आहे.

हे सुद्धा वाचा

यंदाचा स्ट्राईक रेट गेल्या वेळेपेक्षाही अधिक हवा

एमसीएमध्ये शेलारांनी मुंबई प्रीमीयर लिग सुरू केली आहे. आता पालिकेत मुंबई महापालिका विकास लीग तयार करायची आहे. मध्ये एखादा फुटबॉल आला अडथळा आला तर त्याला किक कशी मारायची हे तुम्हाला माहीत आहेत. तुम्ही दोरी उड्या असोसिएशनचे अध्यक्ष आहात. त्यामुळे कुणी कितीही उड्या मारल्या तरी त्याला किती उड्या मारू द्यायच्या हे तुम्हाला माहीत आहे. मागचा आपला स्ट्राईक रेट मोठा होता 35 वरून 80 वर आलो. आता आपला स्ट्राईक रेट मागचा रेकॉर्ड मोडणारा असला पाहिजे याकडे आमची नजर आहे.

थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.