Fadnavis on Thackeray : हिटलरसारखं कुणी वागत असेल, तर संवादापेक्षा संघर्ष बरा; फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल!

फडणवीस म्हणाले, किरीट सोमय्यांवर हल्ला झाला. झेड सिक्युरिटीला तोडून मारलं जातं. मोहित कंबोज यांच्यावर तर मॉब लिंचिंग करण्याचा प्रयत्न झाला. हे राज्यभर होतंय. भाजपच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना घेऊन केलं जातंय. दरेकरांचं तेच झालं. हायकोर्टाचे आभार मानतो. त्यांनी हे ओळखलं.

Fadnavis on Thackeray : हिटलरसारखं कुणी वागत असेल, तर संवादापेक्षा संघर्ष बरा; फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल!
देवेंद्र फडणवीस.
Follow us
| Updated on: Apr 25, 2022 | 1:26 PM

मुंबईः हिटलरसारखं (Hitler) कुणी वागत असेल, तर संवादापेक्षा संघर्ष बरा, अशा धार-धार शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर सोमवारी हल्लाबोल केला. फडणवीस म्हणाले की, ज्या काही घटना मुंबईत आणि महाराष्ट्रात पाहतोय. त्या घटना पाहिल्यानंतर, या सरकारने संवादासाठी जागा ठेवलीय, असं आम्हाला वाटत नाही. जर कुणी हिटलरी प्रवृत्तीने वागायचं ठरवलं असेल, तर संवादापेक्षा संघर्ष केलेला बरा. यामुळे आम्ही आजच्या बैठकीवर बहिष्कार घातलाय. विरोधी पक्षाला जीवानिशी संपवायचं, अशी सरकारची प्रवृत्ती असेल. आमचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना जीवे मारण्यासाठी पोलिसांसमोर हल्ले होणार असतील आणि एफआयआर नोंदवण्यासाठीही संघर्ष करावा लागत असेल, तर अशा बैठकीत जाऊन फायदा काय, असा रोखठोक सवाल त्यांनी केला. खरे तर आज गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी भोंगा प्रश्नावर सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मात्र, त्याकडे विरोधकांनी पाठ फिरवली. त्यानंतर ते बोलत होते.

सगळं मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने…

फडणवीस म्हणाले, किरीट सोमय्यांवर हल्ला झाला. झेड सिक्युरिटीला तोडून मारलं जातं. मोहित कंबोज यांच्यावर तर मॉब लिंचिंग करण्याचा प्रयत्न झाला. हे राज्यभर होतंय. भाजपच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना घेऊन केलं जातंय. दरेकरांचं तेच झालं. हायकोर्टाचे आभार मानतो. त्यांनी हे ओळखलं. पोलिसांचा दुरुपयोग मोठ्या प्रमाणात होत चालला आहे. यांची एकही केस टिकली नाही, टिकूही शकत नाही आणि गृहमंत्र्यांच्या बैठकीला जाऊन फायदा तरी काय? या गृहमंत्र्यांना काही अधिकार तरी आहे का? हे सगळं मुख्यमंत्र्याच्या आदेशाने चाललंय? या बैठकीला मुख्यंमंत्रीच नाही, तर त्या बैठकीला जाऊन फायदाच काय?

महाराष्ट्रानं अशी परिस्थिती बघितली नाही…

फडणवीस म्हणाले की, ज्या प्रकारे आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्यासमोर व्यवहार करण्यात आला. त्यांनी काय सांगितलं होत, आम्ही मुख्यमंत्र्यांच्या घरी हनुमान चालिसा म्हणू इतकंच म्हटलं होतं. महाराष्ट्रानं अशी परिस्थिती कधीच बघितली नाही. सरकारी पक्षाचे लोकं, विरोधी पक्ष विरोधात बोलतो म्हणून हल्ला करतात. आम्ही पोलखोल यात्रा काढली, त्यातून बीएमसीमधील भ्रष्ट्राचार जनतेपुढे मांडला. लोकशाहीत काय करायचं असतं. त्यात त्यांनी आमच्या या पोलखोलवर हल्ला केला. त्यांना वाटत असेल आम्ही थांबू, पण ते होणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.