गोरे दिसण्यासाठी चेहऱ्यावर फेअरनेस क्रिम लावली, पण किडनी डॅमेज झाली
अचानक ती गोरी दिसू लागल्याने तिच्या घरातील अन्य सदस्य अशाच प्रकारे ही गोरे दिसणारी ही क्रिम गालाला चोपडू लागल्या. परंतू हा झटपट गोरे होण्याचा आनंद फार काळ टीकला नाही.
मुंबई : आपला रंग गोरा दिसावा यासाठी अनेक जण चेहऱ्याला वेगवेगळ्या फेअरनेस क्रिमचा प्रयोग करीत असतात. परंतू अशा क्रिम लावताना सावधानता बाळगावी अशी घटना उघडकीस आली आहे. एका वीस वर्षीय बायो टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनीला गोरे दिसण्यासाठी फार मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले आहे. या तरूणीने गोरेपान दिसण्यासाठी लावलेल्या क्रिममुळे केवळ तिच नाही तर तिच्या कुटुंबातील अनेक सदस्यांना किडनीच्या आजाराला सामोरे जावे लागले.
बायोटेक्नॉलॉजीचा अभ्यास करणाऱ्या कविता ( नाव बदलले आहे ) हीला आपला रंग गोरा करण्याचा ध्यास जडला होता. त्यासाठी तिने फेअरनेस क्रिम लावण्यास प्रारंभ केला. यानंतर हळूहळू तिचा रंग उजळू देखील लागला. त्यामुळे सगळे तिची स्तूती करू लागले. अचानक ती गोरी दिसू लागल्याने तिच्या घरातील अन्य सदस्य अशाच प्रकारे ही गोरे दिसणारी क्रिम गालाला चोपडू लागल्या. परंतू हा झटपट गोरे दिसण्याचा आनंद फार काळ टीकला नाही. त्यांना आरोग्य विषयक तक्रारी जाणवू लागल्या. काही दिवसांनी कविताला अशक्तपणा जाणवू लागला. तसेच इतर त्रासही देखील होऊ लागला. त्यानंतर तिला रूग्णालयात दाखल करावे लागले इतका तिचा आजार बळावाला. 2022 च्या सुरूवातीच्या चार महिन्यात कविताच्या किडनी डॅमेज झाल्याचे निदान झाले. डॉक्टरांना अचानक किडनी खराब होण्याचे कोणतेही कारण सापडेना, त्यामुळे डॉक्टर कोड्यात पडले.
अखेर अकोला येथील डॉ. अमर यांनी आपल्या केईएम रूग्णालयाच्या किडनी विकार तज्ज्ञ डॉ. तुकाराम जामाले यांच्याशी संपर्क केला. खूप चर्चा केल्यानंतर या महिलांच्या मेकअप किट पर्यंत प्रकरण पोहचले. या तरूणीच्या मेकअप साहित्यातील क्रिमसह सर्व घटकांची तपासणी केली असता केईएमच्या आयुर्वेदीक प्रयोगशाळेचे तज्ज्ञ एका गोष्टीमुळे हैराण झाले. स्किन क्रिममध्ये मर्क्युरीचे प्रमाण धोकादायक पातळीच्या कितीतरी अधिक प्रमाणात आढळले.
कविताच्या रक्तात मर्क्युरीचे प्रमाण 46 इतके आढळले, वास्तविक ते सात पेक्षाही कमी असायला हवे होते. मर्क्युरी म्हणजे पारा हा जड धातू शरीरासाठी अत्यंत घातक असल्याने त्यांच्या किडनीवर परीणाम झाल्याचे उघडकीस आले आहे. हा कविता हीची आई आणि बहीणी आजारातून बऱ्या झाल्या तरी तिची प्रकृती अजूनही बरी झालेली नाही. 2014 मध्ये दिल्लीच्या एका विद्यार्थीनीच्या स्किन क्रिममध्येही हा धातू धोकादायक पातळीत आढळला होता.