महाराष्ट्रात काय घडतंय? महिला ऑपरेशन्स घटले, कॉन्डोमचा वापर वाढला, नवरा बायकोच्या भांडणांचा जोर

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातील महत्त्वाची घडामोड म्हणजे देशपातळीवर देखील जन्मदर घटला आहे. देशपातळीवरील ट्रेंडप्रमाणं महाराष्ट्रातदेखील कॉन्डोमचा वापर वाढला असल्याचं समोर आलं आहे

महाराष्ट्रात काय घडतंय? महिला ऑपरेशन्स घटले, कॉन्डोमचा वापर वाढला, नवरा बायकोच्या भांडणांचा जोर
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Nov 26, 2021 | 8:59 AM

मुंबई: पाचव्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून (NHFS) प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार संपूर्ण देशभरात जन्मदर घटलाय. महाराष्ट्रातील जन्मदर (Maharashtra Fertility Rate) कमी झाला असल्याचं सर्वेक्षणाच्या अहवालातून समोर आलं आहे. महिलांच्या आपरेशन्सचं प्रमाण देखील कमी झालं आहे. महाराष्ट्रातील महिलांच्या ऑपरेशनचं प्रमाण 50.7 टक्केंवरुन 49.1 टक्केंवर आला आहे. तर, नवरा बायकोच्या भांडणांचा (Spousal Violence) जोर देखील वाढला असल्याचंही समोर आलंय.

महिला ऑपरेशन्स घटले; कॉन्डोमचा वापर वाढला

मुंबईतील जन्मदर कमी होण्यामागं कुटुंबनियोजनाचा अनेक जोडप्यांनी स्वीकार केल्याचं दिसून आलं आहे.राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातील महत्त्वाची घडामोड म्हणजे देशपातळीवर देखील जन्मदर घटला आहे. देशपातळीवरील ट्रेंडप्रमाणं महाराष्ट्रातदेखील कॉन्डोमचा वापर वाढला असल्याचं समोर आलं आहे. 2015 मध्ये चौथ्या राष्ट्रीय आरोग्य सर्वेक्षणातील माहिती प्रमाणं देशभरात कॉन्डोमचा वापर 5.06 टक्के करण्यात येत होता तो आता 9.6 टक्क्यांवर पोहोचला आहे. महाराष्ट्रात देखील 7.1 टक्क्यांवरुन ही आकडेवारी 10.2 टक्केंरपोहोटली आहे.

नवरा बायकोमधील भांडणांमध्ये वाढ

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण 2019-21 च्या माहितीनुसार महाराष्ट्रातील नवरा बायकोमधील भांडणांमध्ये वाढ झाल्याचं समोर आलं आहे. मात्र, दुसरीकडे राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पश्चि बंगाल राज्यातील प्रकरणांमध्ये घट झालीय. राष्ट्रीय पातळीवर नवरा बायकोमधील भांडणांच्या प्रकरणामध्ये घसरण होत असल्याचं दिसत असलं तरी महाराष्ट्रात या संदर्भातील प्रकरण वाढत असल्याचं दिसून आलं आहे.

2015-16 च्या सर्वेक्षणात 18 ते 49 वयोगटातील नवरा बायको यांच्यातील भांडण, विवाहित महिलांविरोधातील कौटुंबिक हिसेंच्या प्रकरणाची टक्केवारी 21.3 टक्के होती. तर, 2019-21 च्या सर्वेक्षणानुसार ही टक्केवारी 25 पर्यंत पोहोचली आहे. याप्रकरणांवर काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी राज्य सरकार यासंदर्भात कोणतीही पाऊल टाकत नसल्याचं म्हटलं आहे.

नेमकी कारणं?

गरिबीचं प्रमाण वाढलं, आर्थिक कमाई बंद झाली की घरातील तणाव वाढू लागतो. आर्थिकदृष्ट्या कमजोर असणाऱ्या कुटुंबातील महिलांवर याचा अदिक परिणीम होतो, असंही दिसून आलं आहे. बेरोजगारी, नोकरी नसणं अशा कारणांमुळं देखील नवरा बायको यांच्यातील भांडणाची प्रकरण वाढत असल्याची दिसून आलं आहे.

इतर बातम्या:

Corona New Variant : दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा वेरिएंट, भारत सरकार सतर्क, राज्यांना महत्त्वाचे आदेश

नागपुरात इंटर्न डॉक्टरवर बंदूक ताणणारा युवक पुण्यात सापडला, आत्महत्या करण्याच्या तयारीत?

Female sterilization drops and Spousal Violence increased in Maharashtra reported by NFHS

Non Stop LIVE Update
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.