Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई विभागातील स्वायत्त महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईनच होणार; उच्च शिक्षण सहसंचालकांचे आदेश

आता मुंबईतील स्वायत्त महाविद्यालयाच्या (Autonomous college) अंतिम वर्षाच्या परीक्षा देखील ऑनलाईनच होणार आहेत. याबाबत मुंबई विभागाच्या उच्च शिक्षण सहसंचालक सोनाली रोडे (Sonali Rode) यांनी पत्राद्वारे मुंबई विभागातील (Mumbai division) स्वायत्त महाविद्यालयांना आदेश दिले आहेत.

मुंबई विभागातील स्वायत्त महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईनच होणार; उच्च शिक्षण सहसंचालकांचे आदेश
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Mar 12, 2022 | 12:14 PM

मुंबई : आता मुंबईतील स्वायत्त महाविद्यालयाच्या (Autonomous college) अंतिम वर्षाच्या परीक्षा देखील ऑनलाईनच होणार आहेत. याबाबत मुंबई विभागाच्या उच्च शिक्षण सहसंचालक सोनाली रोडे (Sonali Rode) यांनी पत्राद्वारे मुंबई विभागातील (Mumbai division) स्वायत्त महाविद्यालयांना आदेश दिले आहेत. याबाबत बोलताना रोडे म्हणाल्या की, मुंबईतील अनेक स्वायत्त महाविद्यालयांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा या ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र महाविद्यालयाच्या या निर्णयाला विद्यार्थ्यांचा विरोध होता. मुंबई विद्यापीठांतर्गंत येणाऱ्या महाविद्यालयातील सर्व अंतिम वर्षाच्या परीक्षा या ऑनलाईन घेण्यात येणार आहेत. मग आमच्याच परीक्षा ऑफलाईन का असा सवाल विद्यार्थ्यांनी केला होता. तशा अनेक तक्रारी देखील उच्च तंत्रशिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. मात्र हे महाविद्यालये स्वायत्त असल्यामुळे त्यांना आदेश देता येत नव्हता. या संदर्भात उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी ऑनलाईन परीक्षा घेण्यात याव्यात या संदर्भात स्वायत्त महाविद्यालयांना पत्र पाठवण्याचे निर्देश दिले होते. सामंत यांच्या निर्देशानुसार सर्व महाविद्यालयांना पत्र पाठवण्यात आल्याचे रोडे यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांचा ऑफलाईन परीक्षेला विरोध का?

मुंबई विभागातील सर्वच स्वायत्त महाविद्यालयांनी अंतिम वर्षांच्या परीक्षा या ऑफलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या निर्णयाला विद्यार्थ्यांनी विरोध केला होता. मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सर्वच कॉलेजच्या परीक्षा या ऑनलाईन होणार आहेत. माग आमच्याच परीक्षा ऑफलाईन का असा सवाल या विद्यार्थ्यांनी उपस्थित केला होता. तसेच त्यांच्या ऑनलाईन परीक्षा घेतल्यास व आमच्या ऑफलाईन परीक्षा झाल्यास आम्हाला मार्क कमी पडण्याची शक्यता आहे, हा आमच्यावर अन्याय होईल तसेच मार्क कमी पडल्यामुळे आम्हाला हवे त्या महाविद्यालयात प्रवेश मिळणार नसल्याची भीती देखील या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली होती.

निर्णयाचे विद्यार्थ्यांकडून स्वागत

दरम्यान या प्रकरणी विद्यार्थ्यांनी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे तक्रार केली होती. विद्यार्थ्यांच्या या तक्रारीची शिक्षण विभागाकडून दखल घेण्यात आली आहे. मुंबई विभागाच्या उच्च शिक्षण सहसंचालक सोनाली रोडे यांनी पत्राद्वारे मुंबई विभागातील स्वायत्त महाविद्यालयांना ऑनलाईन परीक्षा घेण्यासंदर्भात आदेश दिले आहेत. त्यामुळे आता ऑनलाईन परीक्षेचा मार्ग मोकळा झाल्याने विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. या निर्णयाचे विद्यार्थ्यांकडून स्वागत करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

SSC Exams | मुंबईतल्या बहुतांश शाळा पुन्हा ऑनलाइन, काय आहे नेमकं कारण?

Mumbai Megablock: मुंबईकरांनो, रविवारचं लोकलचं वेळापत्रक बघितलं का? 8 तासाचा मेगाब्लॉक

Rashmi Shukla : आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा, 1 एप्रिलपर्यंत कारवाई टळली

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.