Mumbai Fire | मुंबईत आगीची मोठी घटना, मालाडच्या मालवणीत गोदामाला भीषण आग
मालाडच्या मालवणी येथील एका लाकडाच्या गोदामाला आणि प्लास्टिक कंपनीला ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे (fire break out in godown at malad malvani area).
मुंबई : मुंबईतील मालाड येथे एका गोदामाला भीषण आग लागली. मालाडच्या मालवणी येथील एका लाकडाच्या गोदामाला आणि प्लास्टिक कंपनीला ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले. अखेर दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं (fire break out in godown at malad malvani area).
नेमकं काय घडलं?
मालाडच्या मालवणी येथील चिकूवाडी परिसरात एका प्लास्टिकच्या कंपनीला आणि गोदामाला अचानक भीषण आग लागली. आगीची ही घटना रात्री उशिरा साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. रात्री जेवणाच्या वेळेला अचानक ही आग लागली. आगीने आक्राळविक्राळ रुप धारण केल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. आगीचे लोट दूरपर्यंत पसरायला लागले. स्थानिकांनी ही आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण आग नियंत्रणाबाहेर गेली होती. त्यामुळे अग्निशमन दलाला तातडीने या घटनेची माहिती देण्यात आली (fire break out in godown at malad malvani area).
गोदामातील संपूर्ण सामान जळून खाक
अग्निशमन दलाच्या काही गाड्या घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा शर्थीने प्रयत्न केला. काही कालावधीनंतर आग कमी झाली. पण तिने आणखी पेट घेतला. ती आणखी भडकली. पण अग्निशन दलाचे जवान तितक्याच खंबीरपणे काम करत राहीले. अखेर सलग दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. आग पूर्णपणे विझली. पण या आगीत प्रचंड नुकसान झालं आहे. या आगीत गोदामातील सर्व सामान जळून खाक झालं आहे. या आगीत जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आली नाही. घटनास्थळी पोलिसांचा तपास जारी आहे.
हेही वाचा : मुंबईतील हॉटेल व्यवसायिकांना दिलासा मिळणार? पवारांच्या आश्वासनानंतर 2 दिवसांत निर्णयाची शक्यता