डोंबिवलीत केमिकल कंपनीला भीषण आग, केमिकल बॅरेलच्या स्फोटांची मालिका

डोंबिवली एमआयडीसी फेस 2 मधील मेट्रो पोलिटीन (Dombivali Fire) या केमिकल कंपनीमध्ये भीषण आग लागली. आगीमुळे केमिकलच्या ड्रममध्येही सतत स्फोट सुरु आहेत.

डोंबिवलीत केमिकल कंपनीला भीषण आग, केमिकल बॅरेलच्या स्फोटांची मालिका
Follow us
| Updated on: Feb 18, 2020 | 6:31 PM

मुंबई : डोंबिवली एमआयडीसी फेस 2 मधील मेट्रो पोलिटीन (Dombivali Fire) या केमिकल कंपनीमध्ये भीषण आग लागली. या कंपनीत मोठ्या प्रमाणात केमिकलचा साठा आहे. आगीमुळे केमिकलच्या ड्रममध्येही सतत स्फोट सुरु आहेत. अग्निशमन दलाच्या 12 गाड्या आग विझवण्याचे (Dombivali Fire) प्रयत्न करत आहे.

गेल्या पाच तासांपासून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याचा सध्या तपास सुरु आहे. ही आग पसरत असल्याने सुरक्षेच्या कारणात्सव आजूबाजूचा परिसर रिकामी करण्यात आला आहे.

या आगीनंतर या कंपनीतील आणि आजूबाजूच्या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. अग्निशमन दलाचे अधिकारी आणि कर्मचारी आग विझविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण 5 तासांपासून आगीवर नियंत्रण आणण्यास अग्निशमन दलाला अद्याप यश आलेलं नाही.

या आगीमुळे धुराचे मोठे लोळ उठत आहेत. शिवाय परिसरातील रहिवाशांनाही सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या भागाचा दौरा केला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी कंपन्यांना सुरक्षा यंत्रणा राबवा नाहीतर कंपन्यांना टाळे ठोका अशी ताकीद दिली होती.

दरम्यान 2016 मध्ये प्रोबेस कंपनीत अशाच प्रकारे स्फोट झाला होता. त्या स्फोटात तब्बल  12 जणांचा जीव गेला होता.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.