Goregaon, Rabale Fire | गोरेगावात भीषण अग्नितांडव, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल, तर रबाळेतही कंपनीला आग

मुंबई आणि नवी मुंबईत आगीच्या घटना समोर आल्या आहेत. नवी मुंबईत एका कंपनीत आल लागली. तर गोरेगाव पूर्वेत एका भंगार गोदामाला भीषण आग लागली (Fire breaks out in Goregaon and Rabale).

Goregaon, Rabale Fire | गोरेगावात भीषण अग्नितांडव, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल, तर रबाळेतही कंपनीला आग
आग
Follow us
| Updated on: Mar 16, 2021 | 9:17 PM

मुंबई :  मुंबई आणि नवी मुंबईत आगीच्या घटना समोर आल्या आहेत. नवी मुंबईत एका कंपनीत आल लागली. तर गोरेगाव पूर्वेत एका भंगार गोदामाला भीषण आग लागली. गोरेगावात आग लागल्यानंतर गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती देखील समोर येत आहे. ही आग आज (16 मार्च) संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत. आगीत कुणीही जखमी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. अग्नीशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत (Fire breaks out in Goregaon and Rabale).

संजय निरुपम यांचा BMC अधिकाऱ्यांवर निशाणा

दरम्यान, या आगीच्या घटनेवरुन काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी ट्विटरवर मुंबई महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. “गोरेगाव पूर्वेत रत्नागिरी हॉटेलच्या पाठीमागे भीषण आग लागली आहे. घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या आहेत. आग विझल्यानंतर चौकशी केली जाईल. तिथे अवैध कामांचे पुरावे मिळतील. त्या कामांमध्ये मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा हात असल्याची माहिती देखील मिळेल. पण कोणतीही कारवाई होणार नाही. त्यानंतर पुन्हा कुठेतरी आग लागेल, पुन्हा चौकशीचं नाटक होईल”, असं संजय निरुपम ट्विटरवर म्हणाले आहेत (Fire breaks out in Goregaon and Rabale).

रबाळेत कंपनीला आग

रबाळे एमआयडीसीमधील डब्ल्यू 46, ए एस व्ही मल्टी, कंपनीला मोठ्या प्रमाणात आग लागली. अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र 3 तास होऊन सुद्धा आग पूर्णपणे आटोक्यात आली नाही. कंपन्यांमध्ये मोठा प्रमाणात क्रूड ऑइल आणि ग्रीसच्या साठा ठेवण्यात आला आहे. त्यामुळे अडचण होत असल्याची माहिती अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिली आहे. आग बिझबिण्यासाठी वाशी, एमआयडीसी, ऐरोली, बेलापूरमधून गाड्या आल्या आहेत. या आगीत 3 कामगार अडकले होते मात्र स्थानिक नागरिकांनी त्यांना बाहेर काढले. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

सदर कंपनीमध्ये ग्रीस आणि ऑईलचे टॅंक असल्याने मोठ्या प्रमाणात आगीचा भडका झाला. ही आग इतकी भयंकर होती की, आजूबाजूच्या परिसराला धोका निर्माण झाला होता. शेजारिच असलेल्या रिलायन्स कंपनीने याचा विचार करता ताबडतोब स्वतः ची यंत्रणा उपलब्ध केली. आगीवर पाणी आणि स्प्रे मारून आग नियंत्रणात आणली. मागील 3 तासापासून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सदर कंपनीमध्ये २० कर्मचारी काम करीत होते. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनास्थळी रस्त्याचे काम सुरु असल्याने अग्निशमन दलाच्या गाड्या आतमध्ये नेण्यासाठी जवानांची दमछाक झाली. सदर आग कशी लागली याचा तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा : VIDEO: धक्कादायक, वीज ग्राहकाचा संयम सुटला, नांदेडमध्ये कनेक्शन तोडल्यानं शिव्यांची लाखोली वाहत मारण्याची धमकी

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.