मुंबई : मुंबईतील महालक्ष्मी रेल्वेस्थानकाजवळील पुलाखालील दोन सर्व्हिस सेंटरना भीषण आग लागली. रात्री एक वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवलं. अग्निशमन दलाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवलं नसतं, तर शेजारीच असणाऱ्या महालक्ष्मी रेल्वेस्थानकाला ही आग लागण्याची भीती होती.
महालक्ष्मी रेल्वेस्थानकाच्या अगदी जवळच ही आगीची दुर्घटना घडल्याने रेल्वेस्थानक परिसरातील ओव्हरहेड वायरचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता.
सुदैवाने, या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, सर्व्हिस सेंटरमधील 6 मर्सिडीज कार जळून खाक झाल्या आहेत.
महालक्ष्मी रेल्वेस्थानकाच्या पुलाखालील सर्व गाळे हे महापालिकेच्या मालमत्ता विभागाचे असून महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संग्नमत करुन इथे अनधिकृत व्यवसाय चालतात. गेल्या महिन्यात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन या विषयी चौकशी करण्याचे निवेदन दिले होते. तसेच, इथे मोठी दुर्घटना होऊ शकते याबाबत पूर्वकल्पनाही दिली होती. जर मुख्यमंत्र्यांनी व महापालिकेने वेळीच कारवाई केली असती तर ही दुर्घटना टळू शकली असती, असे स्थानिक शिवसेना आमदार सुनिल शिंदे म्हणाले.
Mumbai: Inside visuals from the car service centre where a fire broke out last night. 6 luxury cars affected in the fire. #Maharashtra pic.twitter.com/TcnSUMTyYq
— ANI (@ANI) March 7, 2019