नायर रुग्णालयातील ओपीडी इमारतीची आग आटोक्यात, कोणतीही जीवितहानी नाही
नायर रुग्णालयाच्या ओपीडी विभाग असलेल्या इमारतीला आज (21 नोव्हेंबर) संध्याकाळी भीषण आग लागली (Fire broke out at Nair Hospital).
मुंबई : नायर रुग्णालयाच्या ओपीडी विभाग असलेल्या इमारतीला आज (21 नोव्हेंबर) संध्याकाळी भीषण आग लागली. दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर इलेक्ट्रिक्ट डक्टमध्ये ही आग लागली. आगीची माहिती मिळताच 3 फायर इंजिन, 2 जेट, एडीएफओ रुग्णालयाच्या दिशेला रवाना झाले. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्नीशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही (Fire broke out at Nair Hospital).
Maharashtra: A fire that broke out at the OPD building of Nair Hospital in Mumbai has been extinguished. No casualties reported.
— ANI (@ANI) November 21, 2020
“मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयाच्या ओपीडी बिल्डिंगमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या माळ्यावरील इलेक्ट्रिक डक्टमध्ये शनिवारी लागलेली आग 3 फायर इंजिन, 2 जेटीच्या मदतीने शमविण्यात आली. या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही”, अशी माहिती मुंबई अग्निशमन दलाकडून देण्यात आली (Fire broke out at Nair Hospital).
“शॉर्ट सर्किटमुळे इलेक्ट्रिक केबलमधून धूर निघत होता. याबाबत अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. अग्निमशमन दलाने त्यावर नियंत्रण मिळवलं आहे. या आगीत कुणीही जखमी झालेलं नाही”, अशी माहिती नायर रुग्णालयाचे डीन भारमल यांनी दिली.
हेही वाचा : Corona | एकदा बरं झाल्यानंतरही पुन्हा संसर्गाची शक्यता, लस आल्यानंतरही संकट कायम राहील?