तब्बल 10 तासांनी भिवंडीतील आगीवर नियंत्रण, नुकसान किती?

भिवंडी तालुक्यातील सरवली एमआयडीसी परिसरातील कपिल रेयॉन कंपनीला मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. | Fire control in Bhiwandi MIDC

तब्बल 10 तासांनी भिवंडीतील आगीवर नियंत्रण, नुकसान किती?
Bhiwandi Fire In Conrol
Follow us
| Updated on: Jan 28, 2021 | 3:29 PM

भिवंडी :  तालुक्यातील सरवली एमआयडीसी परिसरातील कपिल रेयॉन (Major Fire Broke Out At Bhiwandi MIDC) कंपनीला मध्यरात्री 3 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. तब्बल 10 तासानंतर भिवंडीतील आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय. (Fire control in Bhiwandi MIDC kapil Reyon after 10 hours)

पाण्याची कमतरता असल्याने पाणी आणण्यासाठी अग्निशामक दलाला 4 किलो मीटर लांब जावं लागत असल्याने आग विझवण्यात अडळथा निर्माण होत होता. कापडाची कंपनी असल्याने विझलेली आग पुन्हा पेटते आहे. त्यामुळे इथून पुढचे काही तास कुलिंगचे काम सुरु राहील .

आगीत कोट्यवधी रुपयांच्या मशीन, कपडा जळून खाक झालेला आहे. ही कंपनी दोन मजली आहे. पहाटे आग लागल्यानंतर भिवंडी महापालिकेच्या 2 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. परंतु आगीची तीव्रता इतकी होती की तिने अग्र स्वरुप धारण करत संपूर्ण इमारतीवर ताबा मिळवला. मात्र, सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

3 वारपिंग ,1 सायझिंग मशीनसह 77 अत्याधुनिक यंत्रमाग आणि कच्चामाल तसंच तयार कपडे असा कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाला आहे. आगीमुळे कंपनीतील सामानाचं मोठं नुकसान होऊन कोट्यवधी रुपयांची वित्तहानी झाली आहे.

दरम्यान, एवढ्या मोठ्या एमआयडीसी क्षेत्रात स्वतंत्र अग्निशामक यंत्रणा नसून पाणी साठवणूक क्षमताही नसल्याने अग्निशामक दलाच्या गाड्यांनी पाणी मारण्यास सुरु केल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांमध्ये पाणी संपत असल्याने पाणी भरण्यासाठी अग्निशामक दलाच्या गाड्यांना सुमारे चार किलोमीटर अंतरावर जाऊन पाणी भरून यावे लागत असल्याने आग पुन्हा भडकत होती.

(Fire control in Bhiwandi MIDC kapil Reyon after 10 hours)

हे ही वाचा :

छोटीशी आग नंतर शक्तिशाली बॉम्बस्फोट, तब्बल 1100 जणांचा मृत्यू

रामटेकडी औद्योगिक वसाहतीतील कचरा प्रकल्पात भीषण आग, अग्निशमन दलाच्या 11 गाड्या दाखल

Non Stop LIVE Update
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.