Video | मुंबईच्या महालक्ष्मी परिसरातील इमारतीला भीषण आग

मुंबईच्या महालक्ष्मी परिसरात भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. विठ्ठल निवास इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली आहे. आग लागलेल्या इमारतीमधून नागरिकांना सुरक्षीत स्थळी हलवण्याचे काम सुरू आहे.

Video | मुंबईच्या महालक्ष्मी परिसरातील इमारतीला भीषण आग
इमारतीला भीषण आग
Follow us
| Updated on: Mar 23, 2022 | 1:18 PM

मुंबईच्या (Mumbai) महालक्ष्मी परिसरात भीषण आग (Fire) लागल्याची घटना समोर आली आहे. विठ्ठल निवास इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली आहे. आग लागलेल्या इमारतीमधून नागरिकांना सुरक्षीत स्थळी हलवण्याचे काम सुरू आहे. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे. या आगीत आतापर्यंत कोणीही मृत अथवा जखमी झाले नाहीये. इमारतीमध्ये अडकलेल्या रहिवाशांना सुरक्षीत स्थळी हलवण्यात येत आहे. आज दुपारी अंदाजे साडेबाराच्या सुमारास ही आग लागली असून, आगीने काही मिनिटांमध्येच रौद्र रूप धारण केले. इमारतीबाहेर आगीचे आणि धुराचे लोळ दिसत आहेत. घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केल्याचे पहायला मिळत आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, महालक्ष्मी परिसरात विठ्ठल निवास नावाची इमारत आहे. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्याला अचानक आग लागली. बघता बघता आगीने रौद्र रुपू धारण केल्याने धूर आणि आगीच्या ज्वाला उसळल्या अचानक आग लागल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

आगीत मनुष्यहानी नाही

महालक्ष्मी परिसरातील विठ्ठल निवासला आज दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. आगीने अवघ्या काही मिनिटांमध्येच रौद्ररूप धारण केले. आग लागल्याचे समोर आल्यानंतर तातडीने इमारतीमध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात आले. सुदैवाने या घटनेत अद्याप कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या घटनेत इमारतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.

संबंधित बातम्या

Pune crime : पोल्ट्री फार्मच्या नावाखाली सुरू होता बनावट दारूचा कारखाना, दोघांना ठोकल्या बेड्या

Pune Crime |आता विश्वास कुणावर ठेवयचा ? पुण्यात सावत्र वडिलांकडून16 वर्षीय मुलीवर बलात्कार

Nashik Crime | मालेगावमध्ये चक्क मनगटापासून हात तोडला; पूर्व वैमनस्यातून अघोरी हल्ला

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.