Mulund Fire | मुंबईत आधी वीज गेली, आता जनरेटर खराब होऊन रुग्णालयाला आग, 40 रुग्णांचं स्थलांतर, एकाचा मृत्यू

आधी संपूर्ण मुंबईतील वीज यंत्रणा कोलमडली आणि सायंकाळी साडेसहा वाजता मुलुंडमधील अपेक्स रुग्णालयात जनरेटर खराब झाल्याने आग लागली.

Mulund Fire | मुंबईत आधी वीज गेली, आता जनरेटर खराब होऊन रुग्णालयाला आग, 40 रुग्णांचं स्थलांतर, एकाचा मृत्यू
Follow us
| Updated on: Oct 12, 2020 | 11:18 PM

मुंबई : दिवसभरात मुंबईत अनेक उलथापालथ होताना दिसत आहे. आधी संपूर्ण मुंबईतील वीज यंत्रणा कोलमडली आणि नंतर सायंकाळी साडेसहा वाजता मुलुंडमधील अपेक्स रुग्णालयात जनरेटर खराब झाल्याने आग लागली (Fire in Mulund COVID Hospital due to over heating of generator). अचानकपणे लागलेल्या या आगीत रुग्णालयातील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. हे रुग्णालय कोविड रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहे. ज्यावेळी घटना घडली त्यावेळी रुग्णालयात जवळपास 40 रुग्ण उपचार घेत होते.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे 11 बंब घटनास्थळी पोहचले असून आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. या रुग्णालयातील रुग्णांना अनेक खासगी रुग्णवाहिकांच्या मदतीने इतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील 3 रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत. पांडुरंग कुलकर्णी (82) या रुग्णाला देखील मुलुंडमधील फोर्टिस रुग्णालयात स्थलांतरीत करण्यात आलं. मात्र, त्यांचा तेथे उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर आणखी एक महिला रुग्ण गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.

मुलुंडच्या अपेक्स रुग्णालयात आग लागल्यानंतर येथील 40 रुग्णांना फोर्टिस, मैथागर, मुलुंड जम्बो सेंटर आणि आस्था रुग्णालयात स्थलांतरीत करण्यात आले आहे. सर्व रुग्णांवर या रुग्णालयांमध्ये पुढील उपचार सुरु आहेत.

भांडूपमध्ये इमारत कोसळली

मुंबईतील मुलुंड येथे एकिकडे आगीची घटना घडली असतानाच दुसरीकडे भांडूपमध्ये इमारत कोसळल्याची घटना घडली. भांडूप पूर्वमधील इंद्रलोक सोसायटी या चार मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील स्लॅब कोसळून ही दुर्घटना घडली. त्यात 4 जण जखमी झाले आहेत. या सर्वांना अनिकेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Fire in Mulund COVID Hospital due to over heating of generator

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.