डोंबिवलीतील केमिकल कंपनीची आग नियंत्रणात, कंपनी जळून खाक
डोंबिवली एमआयडीसी फेस 2 मधील मेट्रो पोलिटीन कंपनीला काल (18 फेब्रुवारी) दुपारी भीषण आग लागली होती. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दालाल यश आलं आहे (Dombivali Fire under contol).
ठाणे : डोंबिवली एमआयडीसी फेज 2 मधील मेट्रोपॉलिटन कंपनीला काल (18 फेब्रुवारी) दुपारी भीषण आग लागली होती. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दालाला यश आलं आहे (Dombivali Fire under contol). तरीदेखील कंपनीत केमिकल असल्याने अधूनमधून आगीचे भडके उडत आहे. कंपनीत केमिकल पूर्णपणे नष्ट करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. कंपनीत सध्या कुलींग ऑपरेशन सुरु आहे. कुलींग ऑपरेशन सुरु असताना काही प्रमाणात धूर निघत आहे. अजूनही अग्निशमन दलाच्या 2 गाड्या आणि 2 टँकर घटनास्थळी आहेत.
डोंबिवली एमआयडीसी फेज 2 मधील मेट्रोपॉलिटन (Dombivali Fire under contol) या केमिकल कंपनीमध्ये काल दुपारी 12 वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या कंपनीत मोठ्या प्रमाणात केमिकलचा साठा होता. आगीमुळे केमिकलच्या ड्रममध्येही सतत स्फोट सुरु होते. या स्फोटाचे हादरे दूरपर्यंत जाणवत होते. या आगीमुळे धुराचे मोठे लोळ उठत असल्यामुळे परिसरातील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं.
या आगीनंतर या कंपनीतील आणि आजूबाजूच्या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं. अग्निशमन दलाचे अधिकारी आणि कर्मचारी आग विझविण्याचे शर्थीने प्रयत्न करत होते. अखेर 15 ते 18 तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाला यश आलं आहे.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या भागाचा दौरा केला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी कंपन्यांना सुरक्षा यंत्रणा राबवा नाहीतर कंपन्यांना टाळे ठोका, अशी ताकीद दिली होती.
दरम्यान 2016 मध्ये प्रोबेस कंपनीत अशाच प्रकारे स्फोट झाला होता. त्या स्फोटात तब्बल 12 जणांचा जीव गेला होता