Mumbai | पालिकेच्या शाळांना मुंबईकर पालकांची पहिली पसंती! 35 हजार विद्यार्थ्यांची भर

पालिकेच्या शाळेतील एकूण विद्यार्थ्यांची संख्या 3 लाख 33 हजारांवरती पोहोचली आहे. मागच्या पंधरा दिवसात ३५ हजार विद्यार्थी वाढल्याची आकडेवारी समोर आली आहे. पालिकेचं मिशन अॅडमिशन : एकच लक्ष्य - एक लक्ष या मोहिमे अंतर्गत विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याची माहिती शिक्षण सहआयुक्त अजित कुंभार यांनी दिली.

Mumbai | पालिकेच्या शाळांना मुंबईकर पालकांची पहिली पसंती! 35 हजार विद्यार्थ्यांची भर
'या' शाळांमध्ये अजिबात ॲडमिशन घेऊ नका रे, शिक्षण खात्यानं सांगितलंय रेImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: May 28, 2022 | 6:56 AM

मुंबई – पालिकेच्या शाळा (Municipal schools) ओस पडू लागल्याची ओरड अनेक वर्षांपासून सुरू आहे. सुविधांचा अभाव आणि शैक्षणिक दर्जा योग्य नसल्याने अनेक पालकांनी आपली मुलं इंग्रजी माध्यमात घातली असल्याचं चित्र मुंबईत (Mumbai) होतं. परंतु मागच्या दोन वर्षांपासून पालिकेच्या मराठी शाळेतील शैक्षणिक दर्जा आणि डिजीटल साधन पुरवल्यानं मुलांचा ओढा शाळेकडे पुन्हा वाढला आहे. नुकतीचं शिक्षकांनी एक मोहिम राबविली त्या माध्यमातून पालिकेच्या शाळेत 35 हजार नवीन विद्यार्थ्यांनी (Student) प्रवेश घेतला आहे. त्यामुळे पालिकेची शाळा पुन्हा भरगच्च दिसणार आहे. इंग्रजी शाळेत ज्या पद्धतीने शिक्षण आणि इतर सुविधा असतात, त्या सुविधा उपलब्ध असल्याने मुलांनी पालिकेच्या शाळेला पसंती दिली आहे.

कोणत्या माध्यमात किती विद्यार्थी वाढले

इंग्रजी माध्यम – 1400

मराठी माध्यम – 8000

हे सुद्धा वाचा

हिंदी माध्यम – 6900

उर्दू माध्यम – 6000

विद्यार्थ्यांची संख्या 3 लाख 33 हजारांवरती पोहोचली

पालिकेच्या शाळेतील एकूण विद्यार्थ्यांची संख्या 3 लाख 33 हजारांवरती पोहोचली आहे. मागच्या पंधरा दिवसात ३५ हजार विद्यार्थी वाढल्याची आकडेवारी समोर आली आहे. पालिकेचं मिशन अॅडमिशन : एकच लक्ष्य – एक लक्ष या मोहिमे अंतर्गत विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याची माहिती शिक्षण सहआयुक्त अजित कुंभार यांनी दिली.

दहावीचा निकाल 54 टक्क्याहून थेट 91 टक्क्यांवर

सध्या पालिकेच्या शाळा आठ भाषेत चालवल्या जात आहेत. आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून शाळेत अनेक अमुलाग्र बदल करण्यात आले आहेत. सध्या पालिकेच्या शाळेत चांगल्या क्लासरूम, मोफत टॅब, मोफत बस अशा सुविधा पुरवल्या जात आहेत. तसेच जागतिक स्पर्धेत पालिकेचे विद्यार्थी टिकावेत यासाठी विविध योजनांची आखणी केली आहे. मागच्या दोन वर्षात पालिकेतील शाळांचा दर्जा चांगला सुधारला असून दहावीचा निकाल 54 टक्क्याहून थेट 91 टक्क्यांवर गेला आहे. या मोहिमेत ‘एक लक्ष’ विद्यार्थी वाढवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. यासाठी जूनपासून ही मोहीम पुन्हा राबवण्यात येणार आहे.

पालिका शाळांमध्ये मिळणारे मोफत शिक्षण, सुविधा, कला क्रीडा आणि अंगिभूत गुणांना मिळणारी संधी याबाबत माहिती दिली जाणार आहे.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.