निवडणूक आयोग मोदी यांचे गुलाम, मी खचलो नाही, खचणार नाही; उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख पाच मुद्दे वाचा

धनुष्यबाण कुणी चोरलं हे तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे या चोरांना आणि चोर बाजाराच्या मालकांना निवडणुकीत गाडल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही. योगायोग असो काही असो आज महाशिवरात्र आहे.

निवडणूक आयोग मोदी यांचे गुलाम, मी खचलो नाही, खचणार नाही; उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख पाच मुद्दे वाचा
uddhav thackerayImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 18, 2023 | 3:18 PM

मुंबई : निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव काढून घेतल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे. वांद्रे येथील कलानगरातून जीपवर उभं राहून उद्धव ठाकरे यांनी घणाघाती भाषण केलं. आपल्या भाषणातून उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोग, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच मी खचलो नाही. खचणार नाही. माझ्या हातात तुम्हाला द्यायला काही नाही. पण या गद्दारांना गाडल्याशिवाय राहायचे नाही, असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे

धनुष्यबाण कुणी चोरलं हे तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे या चोरांना आणि चोर बाजाराच्या मालकांना निवडणुकीत गाडल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही. योगायोग असो काही असो आज महाशिवरात्र आहे. या दिवसांचा महुर्त बघून शिवसेना हे नाव चोरलं गेलं. धनुष्यबाण चोरलं. त्यांनी मधमाश्यांच्या पोळ्याला दगड मारला आहे.

हे सुद्धा वाचा

त्यांनी मधमाश्यांच्या पोळ्याचा स्वाद घेतला आहे. पण आता त्यांना डंख मारण्याची वेळ आली आहे. तुम्ही चिडलेला आहात. आजपर्यंत कोणताही पक्ष नसेल की त्यांच्यावर हा आघत कोसळला नसेल.

यंत्रणा हाताशी धरून पक्ष संपवता येईल, असं भाजप नेते आणि पंतप्रधानांना वाटत असेल. पण त्यांच्या किती पिढ्या उतरल्या तरी शिवसेना संपवता येणार नाही. माझं आव्हान आहे. निवडणूक आयुक्तांनी काल गुलामी केली. निवृत्त झाल्यावर ते राज्यपाल होतील. आताच न्यायामूर्ती राज्यपाल झाले. त्यांनी गुलाम अवतीभवती ठेवले आहेत. गुलामांना आव्हान आहे. शिवसेना कुणाची? शिवसेना कुणाची हे जनतेला ठरवू द्या.

शिवसेना संपवण्याचा यांचा डाव सुरू आहे. यांना ठाकरे नाव पाहिजे. बाळासाहेबांचा चेहरा पाहिजे. पण ठाकरे कुटुंब नको. आम्ही मोदींची नाव घेऊन मते मागितल्याचं सांगत होता. तेव्हा युती होती. एक जमाना होता लोक मोदींचे मुखवटे घालून यायचे. आता मोदींना बाळासाहेबांचा मुखवटा घालून मते मागावी लागत आहेत.

मोदींना बाळासाहेबांचा मुखवटा घालवा लागतो हा आपला मोठा विजय आहे. महाराष्ट्रातील जनतेला असली नकली कोण हे माहीत आहे. आव्हान देतोय ज्या पद्धतीने आपलं शिवसेना हे नाव चोराला दिलं गेलं. आपला धनुष्यबाण चोराला दिला. ज्या पद्धतीने आणि कपट कारस्थानाने हे सुरू आहे. त्यानुसार उद्या हे मशालही काढतील.

माझं आव्हान आहे. धनुष्यबाण चोरणारे तुम्ही जर मर्द असाल तर तुम्ही धनुष्यबाण घेऊन या. मी मशाल घेऊन येतो. बघू काय होते. धनुष्यबाण पेलायला मर्द लागतो. रावणानेही शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला उताणा पडला. या चोरांनाही पेलता येणार नाही. हे मी सांगतो. मी खचलो नाही. खचणार नाही. तुमच्या ताकदीवर मी उभा आहे. जोपर्यंत तुम्हा आहात तोपर्यंत चोर आणि चोरबाजारांच्या मालकांना गाडून आपण त्याच्या छाताडावर उभे राहू.

उद्या फेसबुक लाइव्ह करेल. निवडणूक आयोगाने काय काय सांगितलं होतं ते मी विस्ताराने सांगेन. एकेकाळी काँग्रेस फुटली होती. तेव्हा त्यांचं चिन्हं गोठवलं. ते कुणाला दिलं नव्हतं. कोणत्याही पक्षात वाद झाला तेव्हा मुख्य चिन्ह आणि नाव इतर कुणाला दिलं गेलं नाही. उलट चिन्हं गोठवून नवीन चिन्ह दिलं. हा इतिहास आहे. पण पंतप्रधानांच्या गुलाम आयुक्तांनी आपलं चिन्ह दुसऱ्यांना दिलं आहे.

एवढेच सांगतो. तरुण रक्त पेटवलं आहे. संयम पाळलेला आहे. तुम्हा सर्वांना मी पुढच्या सूचना देत जाईल. तुम्ही कालचा फोटो पाहिलात का रे… माझा चेहरा कसा होता? ज्याच्या हातात धनुष्यबाण होतं त्याचा चेहरा कसा होता? त्याचा चेहरा मीच चोर आहे अशी पाटी लावल्यासारखा होता. ही चोरी पचू द्यायची नाही. आजपासून निवडणुकीच्या कामाला लागा…

तुम्हाला एक सांगतो. मी तुम्हाला भेटायला आलो. आतमध्ये गर्दी मावली नसती. मी तुम्हाला भेटायला रस्त्यावर आलो आहे. शिवरायांचा भगवा घेऊन मी तुमच्यासोबत राहील. हीच शपथ घेऊन पुढे जाऊ या. आज माझ्या हातात काही नाही. मी तुम्हाला काही देऊ शकत नाही. पण शिवसैनिक जोपर्यंत जिवंत आहेत. तोपर्यंत कुणाच्या कितीही पिढ्या आल्या तरी शिवसेना संपवू शकत नाही. आपण या गद्दारांना गाडून पुढे जा ऊच.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.