मुंबई: मुंबईकरांचा आता गाड्यांच्या पार्किंगचा मोठा प्रश्न सुटणार आहे. ज्या रहिवाशांना त्यांच्या इमारतीत किंवा त्यांच्या इमारतीजवळ पार्किंगची जागा नाही, अशा इमारतींल लोकांसाठी मुंबईतील मॉल रात्रीच्या वेळी मॉलच्या पार्किंगमध्ये खासगी वाहने पार्क करण्यास परवानगी देणार आहेत. शहरातील आठ मॉल्स रात्री 11 ते सकाळी 8 या वेळेत नागरिकांना त्यांच्या मॉलच्या आवारात गाड्या पार्क करण्याची परवानगी देणार आहेत. मॉल्मसमध्ये पार्किंगला परवानगी देण्याचा प्रस्ताव मुंबई पार्किंग प्राधिकरणाचा आहे, ज्याला आता आठ मॉल्सने मान्यता दिली आहे. मुंबईत विशेषतः रात्रीच्या वेळी सर्व रस्त्यांच्या कडेला गाड्या पार्क केलेल्या दिसतात, कारण अनेक इमारतींमध्ये रहिवाशांसाठी पुरेशी पार्किंगसाठी जागा नाही.
हे आठ मॉल्स आहेत- कांदिवली ग्रोवेल्स 101 मॉल, अंधेरी इन्फिनिटी मॉल, मालाड इनॉर्डबिट मॉल, कुर्ला फिओनिक्स मार्केटसिटी, घाटकोपर आर सिटी मॉल, मुलुंड आर मॉल आणि लोअर परळमधील फिनिक्स मॉल.
अनेक गाड्या पण पार्किंगला जागा नाही, अशी परिस्थिती मुंबईतील जवळपास सर्वच इमारतींची आहे. मॉल्समध्ये पार्किंगला परवानगी मिळाल्यानंतर रात्रीच्या वेळी मुंबईतील रस्त्यांवरून 6,500 हून अधिक वाहने कमी होऊ शकतील, असं अधिकाऱ्यांचं म्हण्ण आहे. पण, मॉल्स त्यांच्या जागेवर कार पार्किंगसाठी शुल्क आकारणार आहेत. रात्रीच्या वेळी मॉल्समध्ये पार्किंग मोफत असणार नाही. या पॅकिंगसाठी काही मॉल्स दरमहा जवळपास 2,500 ते 3,500 रुपये आकारतील. तर काही मॉल्समध्ये फक्त आठवड्याचा पास असेल, पार्किंगसाठी कमी जागा असलेल्या जवळपासच्या सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांना हा मोठा दिलासा असेल. रस्त्यावर महागड्या गाड्या जोखीम पत्करून पार्क करण्याऐवजी, अनेक लोक काही शुल्क भरून सुरक्षित ठिकाणी गाडी पार्क करण्यास प्राधान्य देतात.
या प्रस्तावाअंतर्गत, मॉलमध्ये ओला आणि उबेर कॅबसाठीही पार्किंगची व्यवस्था केली जाईल. मात्र त्याची रीतसर परवानगी अद्याप मिळालेली नसून त्यावर चर्चा सुरू आहे.
मुंबई पार्किंग प्राधिकरण आणि मुंबई महापालिकेनचा मॉल्सला त्यांचे पार्किंगची जागा वापरण्यास परवानगी देण्याचा हा पहिला प्रस्ताव नाही. बर्याच काळापासून मुंबईतील रस्त्यांवरील गाड्यांची गर्दी कमी करण्यासाठी पार्किंग प्राधिकरण प्रयत्न करत आहे. अनेक मॉल्सना त्यांच्या पार्किंगची जागा सार्वजनिक वापरासाठी देण्यास सांगण्यात आले होते. तर महापालिकेने सुद्धा शहरातील गाड्यांसाठी बहुमजली पार्किंग व्यवस्था उभारण्याचं कामे हाती घेतली आहेत. त्यापैकी बरेच पूर्ण झाले आहेत आणि वापरासाठी तयार आहेत, तर काही अजूनही कार्यरत नाहीत
इतर बातम्या