शिंदे सरकारचीच सीबीआय चौकशी करा; उद्धव ठाकरे यांची सर्वात मोठी मागणी

औषधे बाहेरून आणायला सांगिलं जात आहे. पंतप्रधानांच्या योजना, महात्मा फुले योजना यातून औषधे का दिली जात नाही? मुख्यमंत्री सहायता निधीची मदत कुणाला मिळते? त्याची चौकशी करा. ही मदत जाते कुठे? बिले खरी आहेत का?

शिंदे सरकारचीच सीबीआय चौकशी करा; उद्धव ठाकरे यांची सर्वात मोठी मागणी
uddhav thackerayImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 06, 2023 | 1:21 PM

दिनेश दुखंडे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 6 ऑक्टोबर 2023 : नांदेड, संभाजीनगर आणि नागपूरमधील रुग्णालयात रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला चांगलंच घेरलं आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या मुद्द्यावरून थेट राज्य सरकारविरोधात संताप व्यक्त केला आहे. आम्ही कोरोनाच्या संकटातही माणसांचे जीव वाचवले. मात्र, या सरकारच्या काळात आरोग्याचे बारा वाजले आहेत. कोणतीही साथ नसताना राज्यात भ्रष्टाचाराची साथ आली आहे, असं सांगतानाच आता राज्य सरकारचीच निपक्षपातीपणे सीबीआयकडून चौकशी केली पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली आहे. आज कोणताहीसााथ नाही. फक्त भ्रष्टाचाराची साथ आहे. आरोग्य खात्यात रेट कार्ड ठरवलं जात आहे. निविदा प्रक्रिया बंद केली आहे. निविदा प्रक्रियेशिवाय औषध खरेदी केली जात असेल तर हे कोणत्या तोंडाने भ्रष्टाचारावर बोलणार. तुम्ही भ्रष्टाचाराचे दार उघडे करून देता. आज जिथे औषध खरेदी नाही पोहोचली नाही. तिकडे कुणाचे दलाल आहे काय? त्याची सीबीआय चौकशी करा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

खेकड्यांच्या हाती कारभार का?

आमचं सरकार असताना खेकड्यांनी धरण फोडलं होतं. आज खेकड्यांच्या हातात कारभार गेला आहे का? धरण फोडून भ्रष्टाचाराचं पाणी आपल्या शेतात वळवत आहेत का? गोरेगावला पहाटे आग लागली. मदत जाहीर केली. मदत जरूर करावी. पण मदत करून भागतंय का? ज्यांचे जीव जातोय त्यांचे जीव परत आणता येणार आहे काय? गोव्यात जाऊन टेबलवर नाचायला पैसे आहेत. पण रुग्णांसाठी पैसे नाही. या सरकारची सीबीआय मार्फत निपक्षपाती चौकशी करा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

फक्त चौकशीचा फार्स

काही लोकांवर गुन्हे दाखल केले. त्यांच्यासाठी चौकशीचा फार्स केला. त्यांना क्लिनचीट केली. विरोधकांच्या मागे चौकशीचं शुक्लकाष्ठ लावायचं आणि स्वत:च्या नेत्यांना मोकाट रान द्यायचं. हे योग्य नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

मोदींना मान्य आहे काय?

आमचं सरकार असतानाही काही जागा रिक्त होत्या. पण त्याचा फटका रुग्णांना पडू दिला नव्हता. गेल्या चार पाच दिवसात जे बळी गेले त्यामागे सलग सुट्ट्यांचं कारण आहे काय? सलग सुट्ट्या येतात तेव्हा डॉक्टरांच्या ड्युट्या लावून दिल्या जातात. या सुट्टीच्या दिवसात सुट्टी अॅरेंज केले पाहिजे. या ड्युट्या लावल्या होत्या का? त्याची चौकशी केली पाहिजे. विना निविदा औषध खरेदी केली जाणं हे भ्रष्टाचाराला निमंत्रण आहे. भ्रष्टाचाराविरोधात लढणाऱ्या मोदींना हे मान्य आहे काय? असा सवालही त्यांनी केला.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.