Corona : कोरोनाच्या चौथ्या लाटेचे संकेत, रोज दोन हजार कोरोना रूग्णांची नोंद

दोन वर्षापूर्वी कोरोनाचा देशात शिरकाव झाला होता. त्यावेळी संपुर्ण आरोग्य यंत्रणेसह प्रशासन देखील हादरलं होतं. त्यावेळी केंद्राने प्रत्येक राज्याला सुचना देखील केली होती. महाराष्ट्र राज्य सरकारने कोरोना काळात लागू केलेल्या नियमावलीचा फायदा झाला.

Corona : कोरोनाच्या चौथ्या लाटेचे संकेत, रोज दोन हजार कोरोना रूग्णांची नोंद
कोरोनाच्या चौथ्या लाटेचे संख्येतImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 13, 2022 | 9:01 AM

मुंबई – महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाची (Corona) रूग्णसंख्या वाढत असल्याचं चित्र आहे. राज्यातल्या अनेक महत्त्वाच्या जिल्ह्यात कोरोनाची रूग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य विभागाने (Health Department) चिंता व्यक्त केली आहे. तसेच राज्य शासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन देखील केलं आहे. सध्याची रूग्णसंख्या ज्या पद्धतीने वाढत आहे. त्या अनुशंगाने चौथ्या लाटेचे संकेत मिळत आहेत. रोज सरासरी कोरोना बाधित दोन हजार रूग्णांची मुंबईत नोंद होत आहे. त्यामुळे येत्या काळात नागरिकांना काळजी घ्यावी लागणार आहे. मागच्या 18 दिवसात रूग्ण दुपटीचा कालावधी 3561 दिवसांवरून थेट 561 दिवसांर आला आहे.

तीन कोरोनाच्या लाटा चांगल्या पद्धतीने हाताळल्या

दोन वर्षापूर्वी कोरोनाचा देशात शिरकाव झाला होता. त्यावेळी संपुर्ण आरोग्य यंत्रणेसह प्रशासन देखील हादरलं होतं. त्यावेळी केंद्राने प्रत्येक राज्याला सुचना देखील केली होती. महाराष्ट्र राज्य सरकारने कोरोना काळात लागू केलेल्या नियमावलीचा फायदा झाला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यात आरोग्य यंत्रणेसह प्रशासनाला यश आलं. महाराष्ट्र राज्य सरकारने कोरोनाच्या तीन लाटा व्यवस्थितपणे हाताळल्या आहेत. सध्याची परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. समजा परिस्थिती हाताबाहेर गेल्यास निर्बंध लागू करण्यात येतील असं राज्य शासनाने स्पष्ट केलं आहे.

चौथ्या लाटेची शक्यता

एप्रिल महिन्यात कोरोना रूग्णांची संख्या पुर्णपणे आटोक्यात आल्याचं चित्रं होतं. परंतु मे महिन्यात पुन्हा राज्यात रूग्ण संख्या वाढायला सुरूवात झाली. सध्याच्या स्थितीत रूग्ण दोन हजारांच्या संख्येने सापडत असल्याने चौथ्या लाटेचे संख्येत मिळत आहेत. कानपूरमधील आयआयटीने जूनमध्ये चौथ्या लाटेची शक्यता व्यक्त केली होती.

हे सुद्धा वाचा

दिलेल्या इशाऱ्यानुसार रूग्णसंख्या वाढत असल्याने काळजी घेणं गरजेचं आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.